
कचरा मुक्त गावाचा निर्धार
rat१०१०.txt
बातमी क्र. १० (पान २ साठी, संक्षिप्त)
कचरामुक्त गावाचा निर्धार
दाभोळ ः दापोली तालुक्यातील आवाशी गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ अजय शेडगे यांच्या पुढाकाराने आवाशी येथील शिमगोत्सवामध्ये कचरा मुक्त गाव संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. शिमगोत्सवानिमित्त आवाशी गाव येथील हनुमान मंदिरात प्लास्टीक आणि ओल्या कचऱ्याचे नियोजन कसे करायचे यासाठी पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्लास्टीकच्या विळख्यातले पाणी या विषयांतर्गत पॉवरपाईंटच्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केले. गाव कचरा मुक्त आणि जलयुक्त कसे करायचे याबाबत आणि विषमुक्त शेती करून एक आदर्श गावाची निर्मिती कशी निर्माण करता येईल याची माहिती परांजपे यांनी दिली. शिमगोत्सवानिमित्ताने सामाजिक प्रबोधन करणारे आवाशी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले असून सर्वांनी या गावाचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे मत परांजपे यानी व्यक्त केले. या वेळी रत्नग्रीन टेक्नोसर्व्हिसेसचे मनिष आपटे यांनी घरच्या घरी खत निर्मितीच्या पोर्टेबल युनिटची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
--
दापोलीत साईनगर रस्ता कामाचे भूमिपूजन
दाभोळ ः दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील साईनगर ते भुवडवाडी रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झाले. या रस्त्यासाठी आमदार निधीतून ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, सरपंच अंजली पवार, उपसरपंच संतोष बुरटे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष अजय पवार, दापोली शिवसेना शहरप्रमुख पपू रेळेकर, युवा अधिकारी बाबू पारकर माजी अध्यक्ष वसंत म्हसकर, प्रकाश म्हसकर, सूर्यकांत म्हसकर, युवक मंडळ अध्यक्ष जितेंद्र पवार, शाखाप्रमुख नरेश चरकरे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संजय शिगवण आदी उपस्थित होते.
-