ःकुटुंबांच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा

ःकुटुंबांच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा

rat१०२३.txt

बातमी क्र. २३ (पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl१०३.jpg-
८८१९६
चिपळूण ः भित्तीपत्रकाचे उद्घाटन करताना अपर्णा डिकेय
--

कुटुंबांच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा ः वारे

चिपळूण, ता. १० ः भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये महिलांचा सिंहाचा वाटा असून प्रतिकूल परीस्थितीवर मात करुन पुरुषाच्याबरोबरीने आपली प्रगती आजची महिला साध्य करत आहे हे उल्लेखनीय आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना सन्मानाचे स्थान आहे. संविधानाने प्राप्त झालेल्या अधिकारामुळेच आज महिलांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. याचे अवलोकन विद्यार्थिनीनी करावे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले.
महिला दिनानिमित्त गोविंदराव निकम विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीविषयी उल्लेखनीय माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन सहाय्यक शिक्षिका अपर्णा डिके यांच्या हस्ते झाले. हे भित्तीपत्रक शिल्पा राजेशिर्के व संचिता कदम यांनी तयार केले. मुख्याध्यापक राजेंद्र वारे व उपमुख्याध्यापक विजय काटे यांनी विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. महिलादिनी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com