चिपळूण मतदारसंघासाठी 60 कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण मतदारसंघासाठी 60 कोटीचा निधी
चिपळूण मतदारसंघासाठी 60 कोटीचा निधी

चिपळूण मतदारसंघासाठी 60 कोटीचा निधी

sakal_logo
By

rat१०२९.txt

बातमी क्र. २९ (पान २ साठी)

चिपळूण मतदारसंघासाठी ६० कोटीचा निधी

आमदार निकमांचा पाठपुरावा ; विविध रस्त्यांसह पुलांची कामे

सावर्डे, ता. १० ः आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा करण्याचे सोडलेला नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी ४८ कोटी व सार्वजनिक बांधकामच्या चिपळुणातील नवीन इमारतीसाठी ११ कोटी असा ६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक ते कुंभार्ली घाट रस्त्याची होणारी दूरवस्था व त्यामुळे पावसाळ्यात, वाहनांच्या अपघातामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्राधान्य देऊन या रस्त्यासाठी १ कोटी मंजूर झाले आहेत. चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी व मार्लेश्वर रस्ता डांबरीकरण मंजूर झाले आहे. पेढांबे-खडपोली रस्त्यावरील मोऱ्यांच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे ५४ लाख व ८१ लाख, असुर्डे-कुटरे-राजिवली रस्त्यावरील मोऱ्यांचे रुंदीकरण करणे व नवीन मोऱ्यांचे बांधकाम करणे ४२ लाख ५९ हजार, चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरण ३ कोटी, कोंढ करंबवणे रस्त्यावरील लहान पुलाची पुनर्बांधणीसाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील काटे-तुळसणी, देवरूख-मारळ, मार्लेश्वर, ओझरे मार्गावरील अरुंद व कमकुवत पुलाची बंधाऱ्यासह पुनर्बांधणी करण्यासाठी ३ कोटी २० लाख, सह्याद्रीनगर ते साडवली दरम्यान दोन्ही बाजूला गटार बांधणे १ कोटी, आरवली-माखजन-डिंगणी संगमेश्वर रस्त्याला संरक्षक भिंतीसह स्लॅब ड्रेनचे बांधकाम करण्यासाठी ८० लाख, आरवली-मुरडव- पाचांबे रस्त्यासाठी १ कोटी ८० लाख, तुरळ- कळंबस्ते रस्त्यासाठी ३ कोटी ७० लाख, खेरशेत, कोकरे, कळंबुशी, कासे रस्त्यासाठी २ कोटी २८ लाख मंजूर झाले आहेत. त्याशिवाय मतदारसंघातील अन्य रस्ता कामे, पुलांच्या कामांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे.