
निज्ञान दिन
rat१०३०.txt
बातमी क्र. ३० (पान २ साठी)
(टीप- वितरण विभागाने दिलेली बातमी)
फोटो ओळी
-rat१०p१९.jpg-
८८११७
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रयोग करणारे विद्यार्थी.
-
जीजीपीएसमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
रत्नागिरी : येथील जीजीपीएस विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून दाखवले. नववीच्या विद्यार्थ्याना गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्राच्या संदर्भात असलेले विविध प्रयोग दाखवले गेले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरअप्पा जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्राध्यापिका डॉ. चित्रा गोस्वामी आणि मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर उपस्थित होत्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांनी अरुअप्पा जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते शाळेच्या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले.
--
स्वामी शिवानंद सरस्वती
मंगळवारी रत्नागिरीत
रत्नागिरी : कवळे मठ (गोवा) येथील श्री संस्थान गौडपादाचार्य मठाधिपती प. पू. स्वामी शिवानंद सरस्वती येत्या मंगळवारी (ता.१४) रत्नागिरीत येत आहे. यानिमित्त त्यांचा आशिर्वचन व दर्शन सोहळा सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे आयोजित केला आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत थिबा पॅलेस येथील श्री गगनगिरी स्वामी महाराज मठात स्वामी महाराजांच्या दर्शन सोहळ्यासाठी नागरिक आणि ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी श्री गगनगिरी स्वामी महाराज मठ किंवा मंडळाशी संपर्क साधावा.
--