
जीजीपीएसमध्ये मराठी भाषा दिन
rat१०३१.txt
बातमी क्र. ३१ (पान २ साठी)
(टीप- वितरण विभागाने दिलेली बातमी)
फोटो ओळी
-rat१०p२०.jpg-
८८११८
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलताना कवी नितीन देशमुख.
---------
जीजीपीएसमध्ये शालेय वार्षिक कलाप्रदर्शन
रत्नागिरी, ता. १० : येथील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित शालेय वार्षिक कलाप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.... हे राज्य गीत, मराठी अभिमान गीत गायिले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. अनेक विद्यार्थ्यांनी नाटिका, वक्तृत्व, कथा इत्यादी कलाविष्काराचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी नितीन देशमुख यांनी स्वरचित कवितांचे गायन करून विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मने जिंकली. सूत्रसंचालन मनवा विलणकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी तांबे यांनी करून दिला. अध्यक्षस्थानी जी. जी. पी. एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर आदी उपस्थित होत्या. मराठी विभाग प्रमुख प्रज्ञा सप्रे यांनी आभार मानले.
जीजीपीएसमध्ये मायबोली मराठी दिनानिमित्त शालेय वार्षिक कलाप्रदर्शन भरवण्यात आले. त्या कलादालनाचे उद्घाटन प्रसिद्ध रांगोळी कलाकार राहुल कळंबटे आणि शालेय समिती अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे, चित्रांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन पाच दिवस खुले होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अपर्णा जमादार आणि विश्वेश टिकेकर या कलाशिक्षकांचे खूप योगदान लाभले. यासाठी प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर आणि जीजीपीएस मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.