चिपळूण तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा

चिपळूण तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा

rat१०४४.txt


चिपळूण तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा

इक्बाल खेराटकर ः जुनी पेन्शन योजनेसह १८ मागण्या

चिपळूण, ता. १० : जुनी पेन्शन योजनेसह कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (ता.१४) पासून राज्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला असून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष इक्बाल खेराटकर यांनी दिली.
बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका आरोग्य समन्वय समितीची सभा नुकतीच चिपळूण येथे पार पडली. यावेळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. १४ मार्च पासून पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप यशस्वी करून शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भाग पाडू असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हापरिषद,महानगरपालिका, नगरपालिका समन्वय समितीसह राज्यातील जुनी पेन्शन सह घटक, प्रवर्ग संवर्ग आणि विविध ७२ संघटना सह विविध छोट्या मोठ्या संघटना या संपामधे सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही बेमुदत संप १०० टक्के संप यशस्वी करून शासनाला जाग आणायची आहे. तरी या संपामधे उस्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com