केंद्राच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा
केंद्राच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

केंद्राच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

sakal_logo
By

rat१०४८.txt

-rat१०p२७.jpg-
८८२२०
रत्नागिरी ः दिशा समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे. शेजारी एम. देवेंद सिंह, कीर्तीकिरण पूजार आदी.
---
केंद्राच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा

खासदार राऊत ; जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक

रत्नागिरी, ता. १० : केंद्र शासनाच्या योजनांचे काम वेळेत पूर्ण करा. पाणीपुरवठा संदर्भातील योजनांची कामे तत्काळ मार्गी लावा. संगमेश्वर- निवळी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. महिलांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आवश्यक ती मदत करा, अशा सूचना दिशा समितीचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांनी यंत्रणेला दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक अध्यक्ष खासदार विनायक राऊत आणि सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झाली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.
बैठकीत खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती), ई-अभिलेख, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवाज योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदी योजनांचा आढावा दिशा बैठकीत घेण्यात आला.