स्टुडंट एक्सेंज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टुडंट एक्सेंज कार्यक्रम
स्टुडंट एक्सेंज कार्यक्रम

स्टुडंट एक्सेंज कार्यक्रम

sakal_logo
By

rat१०३४.txt

बातमी क्र. ३४ (पान ५ साठी, संक्षिप्त)

आयसीएस महाविद्यालयात
स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रम

खेड : येथील आयसीएस महाविद्यालय आणि एस. एम. शेट्टी पवई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण केली. विद्यार्थ्यांनी पवई येथील एस.एम.शेट्टी महाविद्यालयाला भेट दिली आणि तेथील शहरी जीवन, संस्कृती यांचा अनुभव घेतला. यानंतर एस.एम.शेट्टी पवईच्या विद्यार्थ्यांनी कोकणात येऊन आयसीएस महाविद्यालयास भेट दिली. प्रा. अश्विनी शेठ यांनी सायबर गुन्हेगारी, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात यांनी एनसीसीबाबत मार्गदर्शन केले. प्रा. ओमकार कापडी यांनी आय. ओ. टी. प्रकल्प प्रात्यक्षिक, विविध प्रकल्पांची माहिती दिली. आयसीएस महाविद्यालयाचे २० विद्यार्थी आणि एस. एम. शेट्टी महाविद्यालयाचे २० विद्यार्थी आणि कर्मचारी यांची दापोली येथे एक अभ्यास सहल काढली होती. शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
---
नवजीवन नामदेव शिंपी समाजातर्फे महिलांचा सत्कार

खेड : येथील नवजीवन नामदेव शिंपी समाज च्या वतीने जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी नगरसेविका सीमा वंडकर, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा दीपिका मुद्राळे, खजिनदार लीना वर्णे, सेक्रेटरी अपर्णा वनारसे, समाजाचे अध्यक्ष दीपक बागडे, सचिव प्रभाकर कोळेकर, खजिनदार रमेश वंडकर, सहसचिव डॉ. रोहन कळंमकर, नासपचे जिल्हा उपाध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य अनिल सदरे उपस्थित होते.
---
कळंबणी खुर्दमधील पाणी टंचाईची मिटली

खेड : तालुक्यातील कळंबणी खुर्द येथील ३५० हून अधिक ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सोडवण्यात बहिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांना यश आले. या ठिकाणी विंधन विहिरीची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे ऐन उन्हाळयात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कळंबणी खुर्द येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत ग्रामस्थांनी खालिद चौगुले यांच्याकडे पाणी समस्येचा प्रश्न मांडला होता. ग्रामस्थांना सतावणारी पाणीटंचाईची समस्या गांभीर्याने घेत हा प्रश्न सोडवण्यासाठी चौगुले यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार विंधन विहिर खोदून ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय दूर केली आहे. चौगुले यांच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
-

वकील, लिपिकांसाठी प्रशिक्षण

खेड : जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डी. एल. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वकील व वकिलांच्या लिपिकांचे प्रशिक्षण शिबिर झाले. सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी संगणकीय प्रणालीसह ई-फायलिंग, विनाकागद न्यायालयीन कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वकील अॅड. संतोष कोठारी, अॅड. केतन पाटणे, अॅड. अभिजित गांधी, अॅड. प्रियेश तलाठी, अॅड. क्षीतिज दामले, अॅड. गमरे, अॅड. सिद्धी खेडेकर, अॅड. दाते, नाईक, अॅड सुरेंद्र मर्चंडे, अॅड. साबळे, अॅड. विजय काणेकर, अॅड. समीर शेठ, अॅड. विक्रांत वाडकर, वकील लिपीक सतिश चव्हाण, समीत म्हादे आदी उपस्थित होते.