अर्थसंकल्पात जिल्ह्याला भरघोस निधी

अर्थसंकल्पात जिल्ह्याला भरघोस निधी

88233
कुडाळ ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी दादा साईल, विनायक राणे, अविनाश पराडकर, बाळू देसाई आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


अर्थसंकल्पात जिल्ह्याला भरघोस निधी

राजन तेली; रस्ते, किल्ले संवर्धनासह मच्छिमारांसाठी तरतूद

कुडाळ, ता. १० ः अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्याने भरभरून निधी दिला आहे. या ठिकाणचे रस्ते, गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि मच्छिमार बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना या अर्थसंकल्पात केल्या आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली बोलत होते. यावेळी भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रवक्ते अविनाश पराडकर, सरचिटणीस बंड्या सावंत, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, अनंत पाटकर आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. या ठिकाणच्या पाटबंधारे विभागाचे कामे तसेच रस्ते, पुल, घाट रस्ते यांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. मच्छीमारांसाठी निधीची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी पुरातत्व खात्याला निधी देण्यात आला आहे. महिलांसाठी एसटी बस प्रवास, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मुलींसाठी कन्या योजना तसेच शेतकऱ्यांसाठी विमा योजना या सरकारने दिल्या आहेत. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com