मुलींची छेड काढल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास

मुलींची छेड काढल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास

rat०२६.txt


छेडछाड प्रकरणी दोघांना कारावास

लांजातील घटना ; मदत करणारा रिक्षाचालकही दोषी

रत्नागिरी, ता. १० ः शाळेत जाणाऱ्या तीन मुलींना भर रस्त्यात वारंवार छेडछाड काढणाऱ्‍याला आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्‍या रिक्षा चालकाला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी (ता. १०) दोषी ठरवले. त्याना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोघांना मिळून ११ हजार रुपये दंड सुनावला. ही घटना एक वर्षापूर्वी जिल्ह्यात घडली होती.

हाजीबा फोंडे (वय २०) आणि रिक्षाचालक चंद्रकांत कोकरे (वय ३०) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पीडित मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार २१ फेब्रुवारी २०२२ आणि त्याअगोदर आठ दिवस संबधित तीन मुलींना शाळेत येता-जाताना आरोपी हाजीबा फोंडे आणि दोन विधीसंघर्षित बालके त्या मुलींशी छेडछाड करून त्यांचा पाठलाग करायचे. या त्रासाला कंटाळून त्यातील एका मुलीने तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. तेव्हा पालकांनी पाळत ठेवली असता सायंकाळी मुली शाळेतून घरी येत असताना त्यांची छेड काढून, पाठलाग करताना तिघे दिसून आले. मुलींच्या पालकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चंद्रकांत कोकरेने त्याना आपल्या रिक्षातून पळून जाण्यास मदत केली होती. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी करून फोंडे आणि कोकरे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अनुपमा ठाकूर यांनी नऊ साक्षीदार तपासले. याबाबत निकाल देताना विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी फोंडेला ३ वर्षे सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंड, कोकरेला ३ वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंड सुनावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com