मुणगेत महिलादिनी रंगले
विविध गुणदर्शन कार्यक्रम

मुणगेत महिलादिनी रंगले विविध गुणदर्शन कार्यक्रम

88133
मुणगे ः येथील भगवती हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.


मुणगेत महिलादिनी रंगले
विविध गुणदर्शन कार्यक्रम

मुणगे, ता. १० ः येथील भगवती हायस्कूलच्यावतीने महिला दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वतीच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून व विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींचे विविध कलागुण दर्शन कार्यक्रम झाले. त्यानंतर सहभोजन कार्यक्रम झाला. यानंतर महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बादलीत बॉल टाकणे स्पर्धेत प्रथम करुणा रुपे, पोस्टरला टिकली लावणे प्रथम प्रतिभा सावंत, संगीत खुर्ची प्रथम हर्षदा मुणगेकर, एका मेनबत्तीमध्ये जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटविणे स्पर्धेत प्रथम जयश्री मेस्त्री तर पाककला स्पर्धेमध्ये प्रथम अश्विनी मेस्त्री, द्वितीय सुप्रिया मेस्त्री, तृतीय करूणा रुपये यांनी यश मिळविले. विद्यार्थिनींच्या वेशभूषा स्पर्धेत लहान गटात जान्हवी मुणगेकर प्रथम, द्वितीय श्रावणी माटवकर. मोठा गट ः प्रथम प्रेक्षा सावंत, द्वितीय गायत्री मेस्त्री. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम अर्चिता कदम, द्वितीय जान्हवी मुणगेकर, तृतीय श्रावणी माटवकर यांना मिळाला आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सरपंच साक्षी गुरव, संजिवनी बांबुळकर, पोलीस पाटील साक्षी सावंत, स्मिता वळंजू, सौ. महाजन, मार्गदर्शक वैदेही ओगले, मुख्याध्यिपिका श्रीमती एम. बी. कुंज, सहशिक्षीका गौरी तवटे आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शक ओगले, संजिवणी बांबुळकर, सरपंच गुरव, सौ. महाजन यांनी मार्गदर्शन केले. गौरी तवटे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका श्रीमती कुंज यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com