
पावणेदोन लाखांची दारू तोरसोळे येथे पकडली
88268
तोरसोळे ः येथे छापा टाकून पोलिसांनी गोवा बनावटीची दारू पकडली.
पावणेदोन लाखांची दारू
तोरसोळे येथे पकडली
छापा टाकून संशयितावर कारवाई
देवगड, ता. १० ः येथील पोलिसांनी तालुक्यातील तोरसोळे पारवळवाडी येथे छापा टाकून सुमारे १ लाख ८० हजार ४८० रुपये किंमतीचा गोवा बनावटीची दारूसाठा हस्तगत केला. याप्रकरणी एका संशयितावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली.
याबाबत श्री. बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तोरसोळे पारवळवाडी येथे गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तोरसोळे पारवळवाडी येथे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलिस शिपाई नीलेश पाटील आदींनी संशयिताच्या घराचे बाजूस छापा टाकला. छाप्यात घराच्या पाठीमागील बाजूस सुमारे १ लाख ८० हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे संशयितावर कारवाई करण्यात आली. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.