दोन महिलांची प्रकृती खालावली

दोन महिलांची प्रकृती खालावली

88270
वैभववाडी ः स्टॉलधारक महिलांशी नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी चर्चा केली.

दोन महिलांची प्रकृती खालावली

वैभववाडीत स्टॉलप्रश्नी उपोषण; नगरपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ

वैभववाडी,ता.१० ः पुर्वीच्याच जागी स्टॉल उभे करावेत, या मागणीसाठी महिला दिनापासून सुरू असलेले महिला स्टॉलधारक महिलांपैकी दोन महिलांची प्रकृती आज बिघडली. त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नगरपंचायत पदाधिकाऱ्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने उपोषण सुरूच आहे.
वैभववाडी नगरपंचायतीने हटविलेले स्टॉल पुन्हा त्याच जागी उभे करण्यात यावे या मागणीसाठी वैभववाडीतील महिला स्टॉलधारकांनी ८ मार्चपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा केली; परंतु त्याने महिला स्टॉलधारकांचे समाधान झालेले नाही. त्यानंतर काल दिवसभर कुणीही अधिकारी चर्चेसाठी आला नाही. उपोषणास सुमारे वीस ते २२ महिला बसल्या आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती रात्री खालावली तर आज अकराच्या सुमारास दुसऱ्या एका महिलेची प्रकृती खालावली त्या दोन्ही महिलांना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे महिलांचे उपोषण सुरूच आहे. आज सकाळी बाराच्या सुमारास नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी स्टॉल हटाओ मोहीमेविरोधातच आगपाखड केली. चांगला पर्याय निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले; परंतु त्याने स्टॉलधारक महिलांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महिलांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
----
सावंत, नाईक यांचा पाठींबा
सायंकाळी उशीरा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही व्यवसाय करीत आहात. प्रशासनाने तुमच्या रोजीरोटीचा विचार करायला हवा होता; परंतु आपणही त्यांच्यावर अतिविश्वास टाकल्यामुळे तुमच्यावरही ही वेळ आली. तुमच्या या लढ्यात आम्ही सोबत आहोत. लोकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नांवर आम्ही राजकारण करणार नाही. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा लढण्याची खरी गरज आहे. आपण गेली ३५ वर्षे या ठिकाणी व्यवसाय करीत आहात. त्यामुळे आपली बाजू भक्कम होती, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंगेश लोके, नंदु शिंदे, उदय जैतापकर, भिमराव भोसले, विनोद कदम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com