
अमिता पाटकर पैठणीच्या मानकरी
88335
साटेली ः पैठणी विजेत्या अमिता पाटकर यांना गौरविताना मान्यवर.
अमिता पाटकर पैठणीच्या मानकरी
सावंतवाडी ः नेहरू युवा केंद्र व एकता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त साटेली येथे आयोजित पैठणीच्या खेळात अमिता पाटकर विजेत्या ठरल्या. तर अमिता पालव यांनी उपविजेता बक्षीस जिंकले. यानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धेत अमिता पालव यांनी प्रथम, प्रणिता जोग, वैष्णवी कांबळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, विलास साटेलकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक, एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनल साटेलकर, सदस्य सविता पांढरे, अमिता पालव, ललिता नाईक, मैत्री ग्राम संघ अध्यक्ष हर्षदा कळंगुटकर, सचिव प्रणिता जोग, कोषाध्यक्ष रसिका नाईक, प्रशांत साटेलकर आदी उपस्थित होते. शुभम धुरी यांनी पैठणी कार्यक्रमाचे निवेदन केले.
..............
चराठे नं. १ शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत आयोजित बाल कला व क्रीडा महोत्सव २०२२-२३ मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे नं. १ ने उल्लेखनीय यश मिळविले. स्पर्धेत हेमांगी मेस्त्री (सातवी) हिने गोळाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. ती क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. तर लहान गट ५०x४ रिले या स्पर्धेत शाळेचा संघ उपविजेता ठरला. या संघात सुशांत गावडे, ईशान चराठकर, तेजस धरणे, वरद दराडे यांचा समावेश होता. या उज्ज्वल कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका वर्षा देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच अमित परब, माजी सरपंच रघुनाथ वाळके, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके आदींनी अभिनंदन केले.