
गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची विशाल परब यांनी घेतली भेट
88337
गोवा ः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल परब यांनी भेट घेतली.
गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची
विशाल परब यांनी घेतली भेट
कुडाळ ः गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज भेट घेत कुडाळ येथे होणाऱ्या भव्य नाट्यप्रयोगाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री सावंत यांनी या नाट्यप्रयोगासह नीलेश राणे यांच्या वाढदिवस समारंभास उपस्थित राहण्याचे आश्वासन यावेळी परब यांना दिले. विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने १७ मार्चला येथील एसटी बसस्थानक नजीक भव्य ''शिवगर्जना'' नाट्यप्रयोगाचे आयोजन कोकणात प्रथमच करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगात हत्ती, घोडे, उंट आदी लवाजम्यासह ७०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक जीवन प्रसंग दाखविले जाणार आहेत. यावेळी भाजपाचे नेते नीलेश राणे यांचा वाढदिवसही साजरा होणार असून या सोहळ्यास महाराष्ट्र, गोव्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
88336
वेत्ये ः विद्यार्थ्यांच्या फळे, भाजी बाजाराचे उद्घाटन करताना सरपंच गुणाजी गावडे आदी.
वेत्ये येथील शाळेत भाजी, खाद्यबाजार
सावंतवाडी ः महिला दिनानिमित्त वेत्ये येथील जिल्हा परिषद शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या, फळे, खाद्यपदार्थांचा बाजार आयोजित केला होता. या बाजाराचा प्रारंभ वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते झाला. शालेय जीवनात पुस्तकी ज्ञान घेत असतानाच पैशांची देवाणघेवाण, कमाईचा आनंद व नफा मिळविणे अशी अनेक उद्दिष्टे साधत मुलांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आनंद मिळविला. पंच सदस्य भगवान गावडे, राजन आंबेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम पाटकर, उपाध्यक्षा पार्वती गावडे, महेश गावडे, मनाली गावकर, दिक्षा नाईक, वेदिका गावडे, भक्ती कोळेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी भाजी, फळे खरेदीसोबत भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, सरबत, लाडू, चहा, पुरणपोळी, ब्रेड कटलेट, फ्राईड राईस, चिकन बिर्याणी अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला.