‘आयनाच्या बायना’तून कोकणी संस्कृतीचे दर्शन

‘आयनाच्या बायना’तून कोकणी संस्कृतीचे दर्शन

टीपः swt११६.jpg मध्ये फोटो आहे.
कणकवली ः ‘आयनाच्या बायना’तून खालचीवाडी आशिये ग्रामस्थ व मंडळ, कलावंतांनी कोकणचे उत्सव, सणांसह संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘आयनाच्या बायना’तून कोकणी संस्कृतीचे दर्शन

आशियेवासीयांचा उपक्रम; शिमगोत्सव, दिवाळी, गणेशोत्सवावर सादरीकरण

कुडाळ, ता. ११ ः ‘आयनाच्या बायना, घेतल्याशिवाय जायना...शबय शबय’ म्हणत कोकणच्या शिमगोत्सवात रंगत आली आहे. ही रंगत ‘आयनाच्या बायना’, या शीर्षकाखाली कणकवली तालुक्यातील आशिये-खालचीवाडी ग्रामस्थ, मंडळ व कलावंतांनी जोपासून कोकणी उत्सव, सणांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.
निसर्गाने नटलेला कोकण परिसर सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. येथील सण-उत्सव, रुढी परंपरा आजही जोपासल्या जातात. आजच्या संगणकीय युगातही या सर्व कला, सण टिकून आहेत. कोकणात गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा आदी विविध सणांबरोबरच शिमगोत्सवाला सुद्धा अनन्य साधारण आहे. कोकणात हा शिमगोत्सव दीड ते पाच, सात, पंधरा दिवसांपर्यंत त्या त्या गावातील परंपरेने ग्रामस्थ साजरा करतात. कणकवली तालुक्यातील आशिये-खालचीवाडी येथील ग्रामस्थ व मंडळ यांच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक, संकल्पक राहुल कदम, निर्माता अमजद शेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयनाच्या बायना’ या शीर्षकाखाली कोकणातील शिमगोत्सवाचे महत्त्व आहे, येथील रुढी, परंपरा यांचे यथार्थ दर्शन यातून घडविले आहे. शिमगोत्सवात घरोघरी राधानृत्यासह विविध सोंगे घेऊन शबय मागण्याची प्रथा आजही टिकून आहे. प्रत्येक घरातून शबय दिली जाते. ‘आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना’ म्हणत या कलावंतांनी कोकणचे सांस्कृतिक सण, उत्सव आजही टिकवून ठेवले आहेत. कोकणातील प्रत्येक सणाला चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी येतात. त्यासाठी मालकांकडून सुटी घेताना अनेक कसरती कराव्या लागतात; पण या सर्व अडचणींवर मात करत चाकरमानी गावी दाखल होतात. त्यामुळे येथील कला, उत्सव आजही रुढी, परंपरांनुसार आजही जोपासल्या जात आहेत. अशा सणांमुळे चाकरमान्यांची पावले गावाकडे वळतात, गावातील माणसेही एकमेकांशी जोडली जातात. त्यामुळे या सणांचा सार्थ अभिमान असल्याचे ‘आयनाच्या बायना’मधून लेखक, दिग्दर्शक कदम, निर्माता अमजद शेख यांनी दाखविले आहे. छायाचित्रण व संकलन सिद्धेश मेस्त्री यांचे असून यात ज्येष्ठ कलाकार सुहास वरुणकर, मिलिंद गुरव, सिद्धेश खटावकर, तेजस रावले, ओम मेस्त्री, अवधूत मेस्त्री यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com