आंब्रडमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

आंब्रडमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

88339
आंब्रड ः श्री हनुमान वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

आंब्रडमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

हनुमान वाचनालयाचा उपक्रम; विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांकडून गौरव

कुडाळ, ता. ११ ः श्री हनुमान वाचनालय व ग्रंथ संग्रहालय, आंब्रड येथे मराठी भाषा गौरव दिनी आयोजित ग्रंथ प्रदर्शनासह विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच विठ्ठल तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे नियमित वाचक पुरोहित महेश कार्लेकर यांच्या हस्ते वाचनालयातील नवीन ग्रंथ संपदा तसेच बाल-कुमार वाङ्मयावरील पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी सीताराम परब, पोलिस पाटील देवेंद्र दळवी, सामाजिक कार्यकर्ते सीताराम दळवी, बाजारवाडी शाळेचे गुरव, कार्यवाह प्रवीण भोगटे, संचालक शशिकांत तेली, अरविंद पांगम, विपिन भोगटे, ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके, भगवान नकाशे, कळसुली हायस्कूलच्या शिक्षिका अश्विनी सुतार, आंब्रड हायस्कूलच्या सौ. हरमलकर उपस्थित होत्या. यावेळी शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रवीण भोगटे यांनी विविध स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. हरिपाठ, स्तोत्र, श्लोक पठण, हस्ताक्षर आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रडच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ग्रंथदिंडीसह कार्यक्रमस्थळी आगमन केले. विविध मराठी राज्य गीत, मराठी गीते सवाद्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
विजेते असे ः चित्रकला प्राथमिक गट-चैतन्य परब, यश तांबे, धनश्री राऊळ, उच्च प्राथमिक गट-अनुली आचरेकर, श्रावणी टक्के, आरोही वाळके. माध्यमिक गट-शुभम कदम (कळसुली हायस्कूल), निखिल तांबे, हर्ष दळवी (कळसुली), हस्ताक्षर स्पर्धा प्राथमिक गट-यश तांबे, जान्हवी तळवडेकर, जान्हवी नाईक, स्वरणी कदम. उच्च प्राथमिक गट-दिव्या गावडे, ऋतुजा राऊळ, रिया तांबे. माध्यमिक गट-तन्वी परब (आंब्रड), सिद्धी राणे (कळसुली), संचिता तांबे (कळसुली), दुर्वांक सावंत (‌कळसुली). हरिपाठ पठण प्राथमिक गट-चैतन्य परब, संग्राम परब, स्वरा मसूरकर, देवांश दळवी. उच्च प्राथमिक गट-श्रेयस दळवी, रुद्र गुरव, झिलू राऊळ, लावण्या कदम. माध्यमिक गट-हर्ष दळवी, वैष्णवी मेस्त्री, प्राची देसाई.
चित्रकला स्पर्धेचे परीक्षण मूर्तिकार अरविंद पांगम, सागर वाळके यांनी, हरिपाठ पठण स्पर्धेचे परीक्षण प्रवीण भोगटे, श्री. गुरव, हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण किरण पारकर, राखी मुंज यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, वाचनालयाच्या छाया राऊळ, विनंती कदम यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com