अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा

sakal_logo
By

88341
कणकवली ः नाभिक संघटना महिला आघाडीतर्फे कल्पना मलये यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक व्हा

कल्पना मलये; कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे महिला मेळावा

तळेरे, ता. ११ : सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात कठीण परिस्थितीशी सामना करत महिलांना शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यामुळे आज महिला सुशिक्षित होऊन उच्चपदी कार्यरत आहेत. सावित्रीबाईंचा आदर्श घेत अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. त्यासाठी जागृत व्हा, एक व्हा आणि सबल बना, असे प्रतिपादन लेखिका, कवयित्री कल्पना मलये यांनी कणकवली नाभिक महिला मेळाव्याप्रसंगी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली नाभिक संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या कणकवली येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात हा मेळावा झाला. संत सेना महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कणकवली शहर महिलांनी ईश्वस्तवन, सातरल महिला मंडळाने सुमधुर स्वागतगीत सादर केले.
तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कवयित्री मलये यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल व कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण यांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जुही शेर्लेकर यांनी मार्गदर्शन केले. चैत्रा चव्हाण, हर्षाली चव्हाण, स्वानंदी कुबल, तनिष्का कुबल, प्रदिप्ती कुबल, शमिका चव्हाण, तन्वी चव्हाण, प्रतीक्षा चव्हाण यांनी नृत्ये सादर केली. संगीत खुर्चीमध्ये चंदा चव्हाण, संजना चव्हाण यांनी यश मिळविले. पाच भाग्यवान विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अणावकर, माजी कणकवली महिला तालुकाध्यक्षा संजना चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर, रचना चव्हाण, सुभाष चव्हाण, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गणेश चव्हाण, उपाध्यक्षा रसिका आचरेकर, कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे आदी उपस्थित होते.