रत्नदुर्गच्या पायथ्याशी वर्षभरात शिवसृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नदुर्गच्या पायथ्याशी वर्षभरात शिवसृष्टी
रत्नदुर्गच्या पायथ्याशी वर्षभरात शिवसृष्टी

रत्नदुर्गच्या पायथ्याशी वर्षभरात शिवसृष्टी

sakal_logo
By

rat१०३३.txt

बातमी क्र. ३३ (पान ६ साठी, मेन)

फोटो ओळी
-rat१०p२३.jpg-
८८१७४
वाटद (ता. रत्नागिरी) ः शिर्केवाडी वाटद-मिरवणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
---

रत्नदुर्गच्या पायथ्याशी वर्षभरात शिवसृष्टी

पालकमंत्री उदय सामंत ; वाटद-मिरवणेत छत्रपतींच्या मंदिराचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : महाराष्ट्रातील सर्वात चांगली शिवसृष्टी रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पुढच्या एक वर्षात उभी होणार आहे. महाराष्ट्राची शान असेल, असा सर्वांत मोठा राजमाता जिजाऊंचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरी येथे पुढील एक वर्षात होणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
तालुक्यातील शिर्केवाडी वाटद-मिरवणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार शशिकांत जाधव, हरिश्चंद्र सावंत, नानासाहेब विचारे, अविनाश पाले, नारायण शिर्के, आबासाहेब सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन आपल्या हस्ते होणे हा आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा हा क्षण आहे. छत्रपतींच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ३५० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केली आहे. या मंदिराकडे जाणारा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये एवढा निधी आमदार निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आपण पालकमंत्री झाल्यानंतर मारुती मंदिर येथे शिवसृष्टी साकारण्यात आली. ती बघण्यासाठी महाराष्ट्रातील लोकं येतात. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्रातील सर्वात चांगली शिवसृष्टी रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पुढच्या एक वर्षात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे सर्वात मोठे ग्रंथालय आणि संशोधन केंद्र हे रत्नागिरी येथे होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---
महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात होणे गरजेचे

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत असताना त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्हयात होणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात आपल्या जिल्हयातून झाली आहे. छत्रपतीं शिवाजी महाराजांचे विचार हा तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले.