
नडगिवेत शिक्षिकांचा सन्मान
88361
नडगिवे ः महिला दिनानिमित्त शिक्षिका, शिक्षकेतर महिलांचा सन्मान करण्यात आला.
नडगिवेत शिक्षिकांचा सन्मान
तळेरे ः आदर्श एज्युकेशन सोसायटी, खारेपाटण संचलित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यासह जागतिक विकासात योगदान देणाऱ्या अग्रगण्य महिलांच्या प्रातिनिधिक सन्मानार्थ विद्यालयातील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर महिला सहयोगिनी व विद्यार्थिनी यांनी मिळून विविध खेळांचे आयोजन केले. या खेळांमधील शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे क्रिकेट सामने रंगतदार झाले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या विद्यालयाच्या या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर महिला सहयोगिनी या सर्वांना विशेष भेटवस्तू देऊन संस्था व विद्यालयाचे समन्वयक पराग शंकरदास, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व पर्यवेक्षक राधेश्याम पांडेय यांच्या हस्ते गौरविले.