तबला वादन उपक्रम अखंड राहावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तबला वादन उपक्रम अखंड राहावा
तबला वादन उपक्रम अखंड राहावा

तबला वादन उपक्रम अखंड राहावा

sakal_logo
By

88367
कणकवली : येथील आचरेकर प्रतिष्‍ठानमधील तबला वादन उपक्रमाचे उद्‌घाटन चारूदत्त फडके यांनी केले. यावेळी डॉ.समीर नवरे, बाळ नाडकर्णी, ॲड.नारायण देसाई आदी. (छायाचित्र : अनिकेत उचले)

तबला वादन उपक्रम अखंड राहावा

चारूदत्त फडके : कणकवलीत तबला वादन कार्यशाळेचा प्रारंभ

कणकवली, ता.११ : तबला वादन ही कला गुरूकडून आत्मसात करावी लागते. त्‍यासाठी जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्‍तीही महत्त्वाची आहे. आचरेकर प्रतिष्‍ठानच्या माध्यमातून तबला वादन कार्यशाळा होतेय ही चांगली बाब आहे. आता तबला वादनाचा हा उपक्रम अखंडपणे सुरू राहायला हवा. ही जबाबदारी विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी, असे आवाहन तालयोगी पं. सुरेश तळवळकर यांचे शिष्य चारुदत्त फडके यांनी केले.
येथील आचरेकर प्रतिष्‍ठानच्या पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राच्यावतीने आज तबलवादन कार्यशाळेचा प्रारंभ झाला. उद्‌घाटन प्रसंगी चारुदत्त फडके बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष अॅड.नारायण देसाई, बाळ नाडकर्णी, विश्वस्त डॉ.समीर नवरे, सीमा कोरगावकर, लीना काळसेकर, मनोज मेस्त्री आदी उपस्थित होते.
वामन पंडित म्हणाले, ‘‘१९८२ साली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना झाली. या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्योत्सव, एकांकिका स्पर्धेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. कणकवलीकरांच्या पाठबळावर ही संस्था वाटचाल करीत आहे. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांना त्याचे ज्ञान व प्रशिक्षण मिळावे यासाठी पं.
पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र सुरू केले असून याअंतर्गत आता तबला वादन प्रशिक्षण दिले जात आहे. तबला वादनाची आवड असणाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन या कलेत पारंगत व्हावे.’’ ॲड.देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.