तृणधान्य पदार्थ स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृणधान्य पदार्थ स्पर्धा
तृणधान्य पदार्थ स्पर्धा

तृणधान्य पदार्थ स्पर्धा

sakal_logo
By

rat११११.txt

पौष्टिक तृणधान्य पदार्थ स्पर्धा

पावस ः चिपळूण तालुका कृषी अधिकारी व इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य पदार्थ स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. या वेळी तालुका कृषी अधिकारी शाहू पवार, मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी, कर्मचारी, शेतकरी व महिला उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat११p.jpg ः

संगमेश्वर ः कसबा येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी खासदार विनायक राऊत, राजेंद्र महाडिक, सुजित महाडिक आदी.
-----
कसब्यात शिवजयंतीनिमित्त रॅली

संगमेश्वर ः शिवजयंतीनिमित्त संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या वेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, संतोष थेराडे, सुजित महाडिक, शंकर भुवड, विनोद झगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवभक्त रॅलीमध्ये सहभागी झाले होते
--

आवक कमी झाल्याने भाजांचे दर वाढले

चिपळूण ः उन्हाळा वाढू लागल्यामुळे भाजीपाला बाजारात भाज्यांच्या दरवाढीला सुरवात झाली आहे. बाजारात वाटाणा, भेंडी, शिमला मिरची आणि गवारची दरवाढ झाली आहे तर कोबी आणि फ्लॉवर सर्वात स्वस्त झाली आहे. कडक उन्हामुळे होणारे भाज्यांचे उत्पादन घटत असते त्यामुळे बाजारात कमी आवक होते. परिणामी, जादा मागणी पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होण्यास सुरवात होते. हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक होत असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात; मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटत आहे. त्यामुळे भाज्यांची दरवाढ झाली आहे. भेंडी, गवार, शिमला मिरची यापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दरानी विकली जात होती. आता या भाज्या ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. दुसरीकडे कोबी, फ्लॉवरचे दर मात्र गडगडले आहेत. आधी प्रतिकिलो २० रुपयाला मिळणारा कोबीचा गड्डा आता दहा रुपयात विकला जात आहे. फ्लॉवरही दहा रुपये किलो दराने विकले जात आहे.
--
अखिल मराठा फेडरेशनच्या सल्लागारपदी रमेशराव शिर्के

चिपळूण ः अखिल मराठा फेडरेशन या अखिल भारतातील मराठा संस्थांना जोडणाऱ्या संस्थेच्या सल्लागारपदी चिपळूण तालुक्यातील चिवेली गावचे रमेशराव शिर्के यांची निवड करण्यात आली. मुलुंड येथे त्यांनी प्रशस्त मराठा भवन साकारले आहे. चिवेली पंचक्रोशीच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. चिवेली हायस्कूल उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. अखिल मराठा फेडरेशन या अखिल भारतातील मराठा संस्थांना जोडणाऱ्या संस्थेच्या सल्लागारपदी त्यांची निवड करण्यात आली. हा आपल्या संस्थेचा, चिवेली गावाचा व चिवेली पंचक्रोशीचा सर्वोत्तम गौरव आहे. तसेच आम्हाला जाज्ज्वल्य अभिमान असून असेच मानसन्मान प्राप्त होवोत व आपल्या चिवेली पंचक्रोशीचा असाच गौरव होवो, असे गौरवोद्गार चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे कार्यवाह रवींद्र शिर्के यांनी काढले आहेत.
-
फोटो ओळी
-Rat११p१३.jpg ः
८८३२९
उमरोली ः आरोग्य शिबिरात महिलांची तपासणी करताना आरोग्य कर्मचारी.
--
उमरोलीत महिलांसाठी आरोग्य शिबिर

मंडणगड ः तालुक्यातील मौजे उमरोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त, महिला व शालेय मुलींचे आरोग्य शिबिर झाले. त्यांना पौष्टिक तृणधान्याचे दैनंदिन आहारातील महत्व सांगण्यात आले. तसेच ज्या महिला व मुलींमध्ये लोह व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे अशा महिलांना नाचणीचे पदार्थ खाण्याबद्दल सुचवण्यात आले. नंतर राजगिरा व नाचणी लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके, डॉ. पुनम सावंत, व्ही. बावस्कर, व्ही. शेंगोकार, प्राध्यापक माने व शिक्षक उपस्थित होते.
--

फोटो ओळी
- rat११p१४.jpg-
८८३३०
देवरुख ः माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित भारतीय हवाई दलाचे अधिकारी
--
माने अभियांत्रिकी महाविद्यालयात
हवाई दलाचे जागरूकता अभियान

देवरुख ः आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दिल्लीतील भारतीय हवाई दलातर्फे इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे कामकाज व रोजगाराच्या उपलब्ध संधींची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्याचा व विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याच अनुषंगाने हवाई दलाने फ्लाईट सिमुलेटर तसेच अन्य सलग्न साधन यंत्रांनी सुसज्य बनविलेल्या एक्झीबिशन व्हेहिकलमधून विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घडवून आणला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे उपस्थित होते. या अभियानात हवाई दलातील प्रशिक्षण व जीवन, भारतीय हवाई दलातील संधी, फ्लाईट सिमुलेटर याविषयी माहिती देण्यात आली. विंग कमांडर सिजोमोन के. व्ही., स्क्वाड्रन लीडर देवाशिष अय्यर, फ्लाईट लेफ्टनंट दया एस. अगरवाल, फ्लाइंग ऑफिसर अंकित भट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.