ट्रामा सेंटरमधील अपुऱ्या सुविधांवर लक्ष वेधले

ट्रामा सेंटरमधील अपुऱ्या सुविधांवर लक्ष वेधले

rat१११४.txt

बातमी क्र. १४ (पान २ साठी)

ट्रामा सेंटरमधील सुविधांवर वेधले लक्ष

आमदार शेखर निकम ः आरोग्य मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

सावर्डे, ता. ११ ः देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे तर संगमेश्वर व चिपळूण कामथे कुटिर उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये भूलतज्ञ व रिक्त पदावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात करत सरकारचे लक्ष वेधले. अपुरे आरोग्य कर्मचारी तथा आवश्यक सोयीसुविधा नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावर अपघातातील रुग्णांना उपचाराविना राहावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर वारंवार अपघात होतात. तुटपुंज्या आरोग्य सुविधांमुळे जखमी रुग्णांवर उपचार होत नसल्याने प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. मुंबई-गोवा महामार्गवरील कामथे कुटिर उपजिल्हा रुग्णालय व पैसाफंड येथील ग्रामीण रुग्णालयात येथे भूलतज्ञ नाहीत. येथील ट्रामा सेंटर बंद आहे. अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे अपघातग्रस्तांना पुणे, मुंबई, कोल्हापूर शहरात उपचारासाठी सल्ला दिला जातो. हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत.
मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातात ग्रामीण रुग्णांना तत्काळ उपचार जिल्ह्याच्या बाहेर न जाता तालुक्याच्या ठिकाणी करता येतील व त्यामुळे रुग्णांचा धोका कमी होईल. या सोईसुविधा शासन करणार का? असा प्रश्न आमदार निकम यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच निर्णय होईल, असे सांगितले. सावंत यांनी निकम अधिवेशनात पोटतिडकीने अपुऱ्या आरोग्य यंत्रणाबाबत मांडलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर-चिपळूण कामथे देवरूख रुग्णालयाबाबत चर्चा करून ट्रामा केअर सेंटरमधील अपुऱ्या सुविधा, रिक्त पदाबाबत लवकरच बैठक घेऊन आरोग्याचा प्रश्न तत्काळ सोडवण्याबाबत सहमती दर्शवली असून, निकम यांच्या उपस्थितीत संबंधित आरोग्य यंत्रणेला घेऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com