ठाकरे गटातर्फे कुडाळात शिवजयंती

ठाकरे गटातर्फे कुडाळात शिवजयंती

88373
कुडाळ : उद्धव ठाकरे गटातर्फे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शहरात रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. (छायाचित्र : अजय सावंत)

ठाकरे गटातर्फे कुडाळात शिवजयंती
कुडाळ : येथे उद्धव ठाकरे गटातर्फे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत काल (ता. १०) शहरात रॅली काढून तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हातात भगवे झेंडे घेऊन आणि भगवे फेटे बांधून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. शिवसेना शाखा, बसस्थानक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजनगर अशी रॅली काढण्यात आली. यात आमदार नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, नागेंद्र परब, जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, योगेश धुरी, सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, श्रेया परब, रुपेश पावसकर, राजू गवंडे, गुरू गडकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, गुरू सडवेलकर, मंजू फडके, अमित राणे, संदीप महाडेश्वर यांच्यासह शिवसैनिक, शिवप्रेमींनी सहभाग घेतला. पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांनी साकारलेली शिवरायांची वेशभूषा लक्षवेधी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com