मनसेच्या वर्धापनदिनी गुहागरातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

मनसेच्या वर्धापनदिनी गुहागरातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

rat११२४.txt

बातमी क्र..२४ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat११p१७.jpg ः
८८३१४
गुहागर ः मनसे वर्धापनदिनानिमित्त सत्कार करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिला.
--

मनसेच्या वर्धापनदिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

गुहागर, ता. ११ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील सर्व समाज तालुकाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापनदिनानिमित्त गुहागर तालुका मध्यवर्ती संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे श्री सत्यनारायण महापूजा, रात्री सांबसदाशिव सभागृह, (पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण) येथे कर्तृत्ववान महिलांचा आणि गुहागर तालुक्यातील सर्व समाजातील तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, विनोद जानवळकर, सुचिता वेल्हाळ, सरपंच मयुरी शिगवण आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू डॉ. योगिता खाडे, माधवी जाधव (संरक्षण अधिकारी), रसिका दळी (उद्योजक), पुनम साळवी (वकील), डॉ. रूपाली जानवळकर (दंत चिकित्सक), वैशाली रहाटे (पोलिस), संगीता भाटकर (एचपी गॅस एजन्सी), अमृता जानवळकर (आशासेविका), मयुरी शिगवण (सरपंच), समीक्षा बारगोडे (सरपंच), विजया मैस्त्री (अंध महिला, उद्योजक) यांचा सन्मान करण्यात आला. गुहागर तालुक्यातील सर्व समाज तालुकाध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन आणि अॅड. सुशील अवेरे, पत्रकार गणेश किर्वे यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com