न पाहिलेले कोकण आता 
लवकरच ‘ओटीटी’वर

न पाहिलेले कोकण आता लवकरच ‘ओटीटी’वर

88376
आंबडपाल ः पत्रकार परिषदेत बोलताना सिने नाट्य अभिनेते दिगंबर नाईक. सोबत जयंती वाघधरे, बनी नाडकर्णी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

न पाहिलेले कोकण आता
लवकरच ‘ओटीटी’वर

दिगंबर नाईक, जयंती वाघधरेंचे अॅंकरिंग

कुडाळ, ता. ११ ः कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गसंपन्नता, लोककला, खाद्यसंस्कृती, गड-किल्ल्यांची समृद्धता लाभली आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या आहेत; पण अजूनही बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. हे ‘न पाहिलेले कोकण’ आता जगभरातल्या लोकांना पाहता येणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे.
यामध्ये मालवणी अभिनेते दिगंबर नाईक, अँकर जयंती वाघधरे आतापर्यंत न पाहिलेले कोकण आणि त्याचे अंतरंग उलगडून दाखवणार आहेत. कुडाळ येथील बनी नाडकर्णी यांचे या कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. आंबडपाल येथे पत्रकार परिषदेत या विषयी माहिती देण्यात आली. आंबडपालचे माजी सरपंच संतोष सावंत यांच्या घरी या कार्यक्रमाच्या एका भागाचे चित्रीकरण सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी भजनी परंपरा आहे. त्यात करून महिलांचे भजन हा एक वेगळा विषय आहे. त्याचे चित्रीकरण सावंत यांच्या घरी झाले. त्यावेळी अभिनेते दिगंबर नाईक, ‘प्लॅनेट मराठी’च्या अँकर जयंती वाघधरे, बनी नाडकर्णी, डीओपी अजित रेडेकर, अश्विनी कांबळे उपस्थित होते. कोकणातील आतापर्यंत न पाहिलेली पर्यटन स्थळे, लोककला, लोकपरंपरा, खाद्यसंस्कृती, गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू दाखविण्यात येणार असल्याचे मालवणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी सांगितले. ‘कधीही न पाहिलेले कोकण’ या शीर्षकाखाली हा कार्यक्रम लोकांसमोर येणार असल्याचे नाडकर्णी म्हणाले. या कार्यक्रमाचे अँकरिंग ‘प्लॅनेट मराठी’च्या अँकर जयंती वाघधरे करत आहेत. या कार्यक्रमाचे चित्रीकरण डीओपी अजित रेडेकर आणि त्यांची टीम करत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संपूर्ण टीम जिल्ह्यात आहे. या टीममध्ये सहाय्यक कॅमेरामन गणेश धुंदाळे, जयेश काळसेकर, प्रमोद पाटील, ओम कुडतरकर, रंगभूषाकार स्वप्नील नेमण यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com