केळूसमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

केळूसमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

केळूसमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

संजीवनी ग्रामसंघ, ग्रामपंचायतीचा पुढाकार

वेंगुर्ले, ता. ११ ः जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत केळूस व संजीवनी ग्रामसंघ, केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपकेंद्र, केळूस येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सरपंच योगेश शेटये यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. महिला दिनानिमित्त केळूस आशा स्वयंसेविका सपना केळूसकर, खुडासवाडी येथील मिनी अंगणवाडी सेविका शांती साटम व आरोग्य तपासणी शिबिरासाठी आर्थिक सहकार्य करणारे विश्राम उर्फ भाई मोबारकर यांचा सन्मान करण्यात आला. आरोग्य चिकित्सा व मार्गदर्शन शिबिरासाठी विशेष सहकार्य करणारे डॉ. अमरेश होडावडेकर (यश क्लिनिक, केळूस), ओम मित्र औषधालयाचे मकरंद देसाई व मकरंद देसाई, रवळनाथ मेडिकलचे प्रज्योत केळूसकर, महिमा मंगेश केळूसकर, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे व आरोग्य उपकेंद्र केळूस यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नेत्रचिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबीन व इतर सर्वसाधारण तपासण्या करण्यात आल्या. उपसरपंच संजीव प्रभू, ग्रामसेवक विवेक वजराटकर, डॉ. धनश्री हिरेमठ, डॉ. गोविलकर, डॉ. तेली, आरोग्य सहायक श्री. मठकर, आरोग्य सेवक श्री. परब, ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, आबा वराडकर, सुभाष साटम, सुषम मसूरकर, रुचिरा प्रभुकेळूसकर, अक्षया केळूसकर, मानसी कुडव, दीप्ती मुणनकर, ग्रामसंघाचे पदाधिकारी निकिता मोबारकर, स्नेहल केळूसकर, आरती गोसावी, सुप्रिया मोबारकर, स्मिता राऊळ, रसिका केळूसकर आदी उपस्थित होते. हेमंत पावसकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com