नाणोसमध्ये महिलादिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणोसमध्ये महिलादिन उत्साहात
नाणोसमध्ये महिलादिन उत्साहात

नाणोसमध्ये महिलादिन उत्साहात

sakal_logo
By

नाणोसमध्ये महिला दिन उत्साहात
सावंतवाडी ः नाणोस ग्रामपंचायत व श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ, मनोरंजन कार्यक्रम, ज्येष्ठ महिला, उद्योजिका, यशस्वी मुली यांचे सत्कार समारंभ असा सोहळा पंचक्रोशीतील महिला सरपंच आणि महिलांच्या उपस्थितीत झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील मुलांनी ईशस्तवन आणि ग्रामसंघाच्या महिलांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवर म्हणून तिरोडा गावच्या सरपंच प्रियांका सावंत, भोमवाडी सरपंच विद्या वराडकर (वाडकर), धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक आदी उपस्थित होत्या. पंच सदस्य सागर नाणोसकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच प्राजक्ता शेट्ये, ग्रामसेवक करंगुटकर यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत उपसरपंच अमिता नाणोसकर, संध्या नाणोसकर, श्रीपाद ठाकूर, विनायक शेट्ये, रसिका जोशी, सानिका शेट्ये यांनी केले. सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांचे स्वागत ग्रामसंघाच्या पदाधिकारी नयन कांबळी, रतिष्मा शेट्ये, सुप्रिया गोडकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी आणि सत्कार सोहळा झाला. संजय नाणोसकर, दादा पालयेकर, चंद्रकांत शेट्ये, अरुण नाणोसकर, नाना कांबळी, अशोक नाईक, चेतन भगत यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण जोशी, मिलिंद नाणोसकर, शारदा जोशी, प्रदीप परब, रघुनाथ जोशी, दाजी तळकर आदी उपस्थित होते.