‘कणकवली’साठी २ हजार २१० कोटी

‘कणकवली’साठी २ हजार २१० कोटी

88404
नीतेश राणे

‘कणकवली’साठी २ हजार २१० कोटी

नीतेश राणे : ठाकरे गटाचे तिन्ही जिल्हाप्रमुख संपर्कात असल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ : महाविकास आघाडी काळात कणकवली मतदारसंघावर सातत्‍याने अन्याय झाला; पण राज्‍यात शिंदे-फडणवीस सरकार आल्‍यानंतर कणकवली मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. यंदाच्या बजेटमध्ये कणकवली मतदारसंघासाठी राज्‍याने तब्‍बल २ हजार २१० कोटी रुपयांचा निधी दिल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. सिंधुदुर्गातील ठाकरे सेनेचे तिन्ही जिल्‍हाप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. त्‍यामुळे ठाकरे सेनेचे भवितव्य आमच्या हातात असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला.
येथे आमदार राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ‘‘२०२३-२४ च्या अर्थसंकल्‍पामध्ये बांधकामच्या हेडखाली कणकवली मतदारसंघाला २३८ कोटी प्राप्त झाले आहेत. यामध्ये कणकवली शहरात साकारणारा कृत्रिम धबधबा, स्पोर्ट कॉम्प्लेक्‍स, रिंगरोड आणि इतर विकासकामे होणार आहेत. याशिवाय कणकवली शहराच्या नगरोत्‍थान विकास योजनेसाठी शासनाने साडेबारा कोटी रुपये दिले आहेत. तर जिल्‍हा वार्षिक पर्यटनासाठी १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. देवगड नगरपंचायतीमध्ये लोकांनी आम्‍हाला नाकारले; पण आम्‍ही जनतेशी बांधील आहोत. तेथील जनतेवर अन्याय होता नये, यासाठी देवगड नगरपंचायतीसाठी २ कोटी ७५ लाख रुपये आणले आहेत. तर नगरोत्थानसाठी ४ कोटी ३५ लाख प्राप्त झाले आहेत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीसाठी अडीच कोटी आणले आहेत. तर नगरोत्‍थानअंतर्गत १ कोटी ३० लाख निधी आला. जिल्‍हा वार्षिक योजनेंतर्गत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघासाठी २५ कोटी मिळाले. डोंगरी विकास निधीमधून आम्‍ही सुचविलेल्‍या कामांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘तळेरे-विजयदुर्ग रस्ता दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी, गगनबावडा-तळेरे रस्त्यासाठी अडीचशे कोटी आणि देवगड-फोंडाघाट-निपाणी रस्त्यासाठी ८३९ कोटींचा निधी आला आहे. पंतप्रधान गामडक योजना ४२ कोटी मिळाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस १६ कोटी मिळाले. २५-१५ योजनेसाठी ५ कोटी मिळाले. अल्‍पसंख्यांक मतदारसंघासाठी १ कोटी, समाजकल्‍याणसाठी १ कोटी, पाटबंधारे विभाग छोटे बंधारे यासाठी ३२५ कोटी माझ्या मतदारसंघासाठी मिळाले आहेत. ही कामे लवकर सुरू होतील. कामांचा दर्जा चांगला राहावा, यासाठी दक्षता बाळगणार आहे.’’
...............
ठाकरे गटाचे भवितव्य आमच्या हाती
राणे म्हणाले, ठाकरे गटाने अलीकडेच तिघांची जिल्‍हाप्रमुखपदी नियुक्‍ती केली; मात्र तिघेही जिल्‍हाप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. यातील दोघे शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. तर एकजण आमच्याकडे येणार आहे. त्‍यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे सेनेचे भवितव्य आमच्या हाती आहे. व्हेंटिलेटरवरील सिंधुदुर्गातील ठाकरे सेना किती काळ जिवंत ठेवायची हे आम्‍हीच निश्‍चित करू.
..................
केसरकरांना निवडून आणावे लागणार
राज्‍यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. तर शिंदे गटामध्ये दीपक केसरकरांवर महत्त्‍वाची जबाबदारी आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असल्‍याने सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांना आम्‍हाला निवडून आणावे लागेल, असेही आमदार राणे म्‍हणाले.
--
ठाकरे गटाच्या सरपंचांनी विचार करावा
आम्‍ही सत्ताधारी आमदार आहोत. त्‍यामुळे विकासासाठी प्रचंड निधी आणू शकतो, हे आम्‍ही दाखवून दिले. त्‍यामुळे ठाकरे गटाच्या सरपंचांनी आता विचार करायला हवा. ते आमच्याकडे आले तर त्‍यांच्या गावांचा विकास करण्याची जबाबदारी आम्‍ही घेऊ, असे आमदार राणे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com