-निमंत्रित क्रिकेट मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-निमंत्रित क्रिकेट मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीचे वर्चस्व
-निमंत्रित क्रिकेट मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीचे वर्चस्व

-निमंत्रित क्रिकेट मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीचे वर्चस्व

sakal_logo
By

rat११२. txt


फोटो ओळी
rat११p२८.jpg ः
८८३९२
रत्नागिरी ः रत्नागिरीतील छोटू देसाई अॅकॅडमीच्या क्रिकेट संघाने गडहिंग्लज संघावर ४-० असा मालिका विजय मिळवला.
---------
क्रिकेट मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीचे वर्चस्व

एकतर्फी विजयी ः सार्थक देसाईला मालिकावीराचा पुरस्कार

रत्नागिरी, ता. ११ः येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे गडहिंग्लज तालुका क्रिकेट क्लबला १४ वर्षाखालील संघाला २५ षटकांच्या चार सामन्यांच्या मालिकेसाठी आमंत्रित केले होते. या मालिकेत छोटू देसाई अॅकॅडमीच्या संघाने ४-० असा विजय मिळवला.
कोल्हापूर जिल्हा संघाचे माजी क्रिकेटपटू गणेश म्हाडदळकर यांनी हा संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत आणला होता. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात गडहिंग्लज तालुका क्रिकेट क्लबने २५ षटकात ८ बाद ८८ धावा केल्या तर छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने २० षटकात १ बाद ८९ धावा करत हा सामना ९ गडी राखून जिंकला. या सामन्यात कुणाल गावडे-३० धावा याला सामनावीराने सन्मानित केले. दुसऱ्या सामन्यात छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने २५ षटकात ३ बाद १२९ धावा केल्या. गडहिंग्लज क्रिकेट क्लबने २५ षटकात ८ बाद ९९ धावा केल्या. हा सामना छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने ३० धावांनी जिंकला. या सामन्यात ५४ घावा व २५ धावात ३ बळी घेणारा सार्थक देसाई सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने २५ षटकात ५ बाद १२० धावा केल्या. गडहिंग्लज तालुका क्रिकेट क्लबचा संघ २५ षटकांत सर्व बाद ११७ धावापर्यंत मजल मारू शकला. हा सामना छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने ३ धावांनी जिंकला. सामनावीर पाटील (३८ धावा) याला सामनावीरचा किताब देण्यात आला. चौथ्या सामन्यात गडहिंग्लज तालुका क्रिकेट क्लबने २० षटकांत सर्वबाद ८१ धावा केल्या. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने १९ षटकांत ४ बाद ८२ धावा करत ६ गडी राखून सामना जिंकला. सार्थक देसाई (२५ धावा व ३बळी) याने सामनावीरचा किताब पटकावला. स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार सार्थक देसाई याला देण्यात आला. अॅकॅडमीच्या या यशाबद्दल अॅकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे यांनी संघाचे कौतुक केले.