सद्गुरू माता सुदीक्षा 16 मार्चला रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सद्गुरू माता सुदीक्षा 16 मार्चला रत्नागिरीत
सद्गुरू माता सुदीक्षा 16 मार्चला रत्नागिरीत

सद्गुरू माता सुदीक्षा 16 मार्चला रत्नागिरीत

sakal_logo
By

rat११२८.TXT

बातमी क्र.. २८ (पान ५ साठी)

सद्गुरू माता सुदीक्षा गुरुवारी रत्नागिरीत

चंपक मैदानात कार्यक्रम ः परजिल्ह्यातून भक्त येणार

रत्नागिरी, ता. ११ ः महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेअंतर्गत विश्वबंधुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांचे रत्नागिरीत आगमन होत आहे. गुरुवारी (ता.१६) सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत एकदिवसीय निरंकारी संत समागमाचे आयोजन उद्यमनगर शिरगांव येथील एमआयडीसीमधील चंपक मैदानावर करण्यात येत आहे.
एक दिवसीय संत समागमांची ही अविरत श्रृंखला अशीच चालू आहे. रत्नागिरीनंतर राज्यातील सांगली शहर तसेच गोवा राज्य येथे असेच एक दिवसीय संत समागम आयोजित केले जाणार आहेत. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित होत असलेल्या या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचा आनंद प्राप्त करण्यासाठी मुंबई-पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, लांजा, राजापूर तसेच आजुबाजूच्या भागातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. निरंकारी संत समागमात प्रचारक महात्मा तसेच अन्य भक्तजन मिशनच्या संदेशाची चर्चा करतात. यामुळे श्रद्धाळू भक्तांची श्रद्धा ही द्विगुणित होतेच व पहिल्याच वेळेला आलेल्या जिज्ञासूनांही मिशनच्या उपदेशाबद्दल माहिती मिळते. समागम स्थळी एकावेळी हजारोंच्या संख्येने आध्यात्मिक विचार श्रवण करण्यासाठी सत्संग हॉल, मान्यवरांच्या स्वागतार्हत स्वागतकक्ष, संत निरंकारी मिशनचा इतिहास व आध्यात्मिक साहित्य उपलब्ध असणारे प्रकाशन स्टॉल ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.