अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

sakal_logo
By

rat११६.txt


असुर्डेत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

चिपळूण, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावर असुर्डे येथे एका अवघड वळणावर अज्ञात वाहनाने एका मोपेडला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये चिरंतर मनोहर जाधव (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून ठोकर देणारे वाहन चालक मात्र पसार झाला आहे.
सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १०) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आसुर्डे येथे अवघड वळणावर हा अपघात झाला. याची फिर्याद विनय श्रीपत जाधव (रा. बौद्धवाडी, येगाव) यांनी सावर्डे पोलिसात दिली. ते चिपळूण-येगाव असे जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये विनय श्रीपत जाधव हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या गाडीवर मागे बसलेले चिरंतर मनोहर जाधव यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सावर्डे पोलिस करत असून सर्व ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात येत आहेत. तपासासाठी काही पथके मुंबई व सिंधुदुर्गच्या दिशेने पाठवण्यात आली असून अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन शोधण्याचा प्रयत्न सावर्डे पोलिस करत आहेत.