चिपळुणात घराघरात खोकल्याचा आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात घराघरात खोकल्याचा आजार
चिपळुणात घराघरात खोकल्याचा आजार

चिपळुणात घराघरात खोकल्याचा आजार

sakal_logo
By

चिपळुणात घराघरात
खोकल्याचा आजार
घाबरून न जाण्याचे डॉक्टरांचे आवाहन

चौकट
काळजी घेणे गरजेचे
* कोणाशीही हस्तांदोलन करू नये
* सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
* डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषध नको

चिपळूण, ता. ११ः मागील काही दिवसांपासून एच थ्री एन टू या आजाराचा देशात झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. यातच चिपळूणात खोकला आणि तापाचा आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात घराघरात खोकल्याची लागण झाल्याचे चित्र आहे. एच थ्री एन टू या या आजारात खोकला, ताप, चक्कर आणि मळमळ येणे अशी लक्षणे दिसून येतात पण त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
चिपळूण शहरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडे कान, नाक, घसा तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चिपळूण शहर आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला येत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. इन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार असलेल्या एच3 एन2 या आजाराची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश डॉक्टर देत आहेत. नागरिकांमध्ये कान, नाक, घसा दुखण्याचे प्रकार वाढले आहेत. या आजाराचा सामना करण्यासाठी डॉक्टर रुग्णांना खबरदारीच्या उपायोजना करण्यास सांगत आहेत.
----------
कोट
व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असल्यास मास्कचा वापर करावा. खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रूमाल धरावा. साबणाने नियमित हात धुवावेत. गारठ्यात फिरू नये. खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू खाणे टाळावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्यावा.
- डॉ. अल्ताफ सरगुरोह, चिपळूण