
तेर्सेबांबर्डेतील अपघातात हुमरसचे तिघे जखमी
88428
तेर्सेबांबर्डे ः अपघातग्रस्त नॅनो.
तेर्सेबांबर्डेतील अपघातात
हुमरसचे तिघे जखमी
कुडाळ, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावरील तेर्सेबांबर्डे-बिबवणे दरम्यान आज दुपारी दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले. एकनाथ परब, गोपाळ सावंत आणि सोनू लिंगवत अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे समजते. त्यांना पणजी-गोवा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
हुमरस येथील शिवसेना पदाधिकारी नॅनो मोटारीने कुडाळकडे येत असताना मागून आलेल्या त्य़ांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. यामध्ये नॅनो मोटार तीन ते चार पलटी घेत महामार्गाच्या बाजूला जाऊन धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की नॅनो मोटारीचा चारही बाजूंनी चक्काचूर झाला. यावेळी तेथे दाखल झालेल्या पोलिस व प्रवाशांनी जखमींना अधिक उपचारासाठी कुडाळ प्राथमिक रुग्णालयात हलविले. तेथून अधिक उपचारांसाठी गोवा येथे पाठविण्यात आले.