माणगाव रुग्णालयात बांधली गुरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव रुग्णालयात बांधली गुरे
माणगाव रुग्णालयात बांधली गुरे

माणगाव रुग्णालयात बांधली गुरे

sakal_logo
By

88457
माणगाव ः प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हैशी बांधून आंदोलन करताना योगेश धुरी, मनीषा भोसले, मथुरा राऊळ, तेजस्विनी नाईक, बंड्या कुडतरकर, अजित परब, बापू बागवे, रुपेश धारगळकर आदी.

माणगाव रुग्णालयात बांधली गुरे

ग्रामस्थांचे आंदोलन; औषध साठा उपलब्ध नसल्याच्या निषेधार्थ पवित्रा

माणगाव, ता. ११ ः येथील प्राथमिक आरोग्य केंदात औषध साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत असल्याच्या निषेधार्थ माणगाव युवा सेनेच्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात म्हैसी बांधून आंदोलन केले. 
यावेळी युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक मथुरा राऊळ, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, सदस्या तेजस्विनी नाईक, शिवसेना विभाग प्रमुख बंड्या कुडतरकर, उपविभाग एकनाथ धुरी, युवासेना विभाग प्रमुख रुपेश धारगळकर, वसोली सरपंच अजित परब, अमोल धुरी, भास्कर धुरी, साई नार्वेकर, प्रकाश मेस्त्री, सच्चिदानंद सावंत आदी उपस्थित होते.
माणगाव खोऱ्यातील २७ गावांसाठी हे एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गोरगरीब जनता औषधोपचारासाठी या रुग्णालयात येत असतात; परंतु येथील वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील हे रुग्णांना बाहेरील औषध लिहून देतात. महागडी औषध गरीब लोकांना घेणे शक्य नसल्याने उपचाराविना रुग्णांना घरी जावे लागते. साधे सर्दी खोकला, टी.टी. कॅल्शियमच्या गोळ्या, बी.पी. गोळ्या सुध्दा उपलब्ध नाहीत, असा आरोप करीत याबाबत अनेक वेळा सांगून सुध्दा औषध उपलब्ध होत नसल्याने हा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला, असे योगेश धुरी यांनी सांगितले
चार तासांनंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी औषध पाठवून दिली; परंतु एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनकर्त्यांच्या भेटीला आला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी फोनही उचलत नव्हते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आंदोलनकर्ते व अधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. योगेश धुरी व शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळी अचानक ११ च्या सुमारास दोन म्हैशी घेऊन आरोग्य केंद्रात दाखल होताच वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी व नातेवाईकांनी आपल्या तक्रारी योगेश धुरी व सहकाऱ्यांना सांगितल्या. तसेच पालकमंत्र्यांनी रुग्णालयात आणून ठेवलेली बॉडी चेकअप मशिन धूळ खात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी योगेश धुरी, सरपंच भोसले, मथुरा राऊळ, बंड्या कुडतरकर, साई नार्वेकर, अजित परब यांनी आरोग्य अधिकारी उमेश पाटील यांच्याशी चर्चा करून यापुढे औषधाविना रुग्णांचे हाल होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.