
माजी नगरसेवक शेख यांचे रिव्हाल्व्हर जप्त
माजी नगरसेवक शेख
यांचे रिव्हाल्व्हर जप्त
सावंतवाडी, ता. ११ ः बाजारपेठेत बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंद असलेले माजी नगरसेवक नासीर शेख यांचे रिव्हाल्व्हर आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
शेख यांच्या विरूद्ध हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सावंतवाडी पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सामाजीक कार्यकर्ते तथा पोलिसांच्या या प्रक्रियेबाबत उपोषणाचा इशारा दिलेले रवी जाधव यांना सावंतवाडी पोलिस निरीक्षक एफ. बी. मेंगडे यांनी पत्रातून दिली आहे. शैबाज सैफुद्दीन काजरेकर यांनी २१ फेब्रुवारीला येथील पोलिस ठाण्यात श्री. शेख यांच्याविरूध्द तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपत्र गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी श्री. जाधव यांनी पोलिस अधिक्षकांकडे निवेदन देत शेख यांच्यावर कारवाईची तसेच रिव्हाल्व्हर जप्त करण्याची मागणी केली होती. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.