प्रवासातून २ लाखाचा मुद्देमाल चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासातून २ लाखाचा मुद्देमाल चोरीस
प्रवासातून २ लाखाचा मुद्देमाल चोरीस

प्रवासातून २ लाखाचा मुद्देमाल चोरीस

sakal_logo
By

प्रवासातून २ लाखाचा मुद्देमाल चोरीस
कणकवली : मुंबई-पुणे ते कासार्डे असा खासगी बसमधून प्रवास करत असताना २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबतची तक्रार कासार्डे येथील दीपिका भास्कर नर (वय ३५ रा. चेंबुर-मुंबई, मूळ रा. करवीर-कोल्हापूर) यांनी आज कणकवली पोलिसांत दिली. मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचच्या दरम्‍यान ही घटना घडली. दीपीका नर या खासगी बसने काल (ता. १०) मुंबई, पुणे ते कासार्डे प्रवास करत होत्या. रात्री १२.३० वाजता बस पुणे येथे जेवणासाठी थांबली तेव्हा पर्समध्ये साहित्य होते; परंतु आज पहाटे ५.३० वाजता कोल्हापूर येथे जाग आली तेव्हा किती वाजले हे पाहण्यासाठी पर्समधील मोबाईल काढण्यासाठी पर्स उघडली. तेव्हा त्यामधील दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही. पर्समध्ये एक सोन्याची चेन, दोन अंगठ्या, एक ब्रेसलेट व २२ हजार रोख रक्कम होती. त्यानंतर गाडीमध्ये शोधाशोध केली; परंतु दागिने सापडून आले नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे.
-------------------
ओटव येथील तरुणाची आत्महत्या
कणकवली : तालुक्‍यातील ओटव-गावठाणवाडी येथील सूरज बंडू मालप (वय २४) या युवकाचा मृतदेह काल (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी गळफास स्थितीत आढळून आला. त्‍याबाबतची माहिती त्‍याचे काका अनिल रामचंद्र मालप यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.