कणकवलीत २०ला गायन स्पर्धा

कणकवलीत २०ला गायन स्पर्धा

कणकवलीत २०ला गायन स्पर्धा
कणकवली ः येथील रोटरीच्या आनंद मेळाव्यात २० मार्चला गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बाल गटात सात ते बारा वयोगटात आणि किशोरवयीन १३ ते १८ वयोगटात स्पर्धा होणार आहे. तसेच खुल्या गटांमध्ये १८ ते ३५ वर्षे नागरिकांनाही यात सहभाग घेता येणार आहे. तसेच अंध, अपंग, मतिमंद मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
-------------
फोंडाघाट परिसरात उन्हाचा पारा तापला
फोंडाघाट ः येथील परिसरात उन्हाचा पार तापला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होवू लागली आहे. दुपारच्या वेळेत घराभाहेर पडने धोका दायक बनले आहे. पहाटे काहीसे थंड वातावरण वगळता दिवसभर उन्हाचा पारा वाढ जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवरात काम करणे कठीण झाले आहे.
----
कनेडी रस्त्याची दुरवस्था
कणकवली ः कणकवली ते कनेडी रस्त्याची पुन्हा एकदा दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालवने धोकादायक झाले आहे. शहरातून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यत जाणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com