सदर ः मुलांमध्ये स्व दूरदृष्टीपणा विकसित करणारे शिक्षण हवे

सदर ः मुलांमध्ये स्व दूरदृष्टीपणा विकसित करणारे शिक्षण हवे

६ मार्च पान ३ टुडेवरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे...
फोटो ओळी
-rat१२p१६.jpg ः - डॉ. गजानन पाटील
---------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल

मुलांमध्ये स्व दूरदृष्टीपणा विकसित करणारे शिक्षण हवे!

शिक्षणाने माणूस मोठा होतो. त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार होतात. त्यातून त्याची चांगली जडणघडण होते. शिक्षणाच्या माध्यमातून माणसाच्या जीवनाला आकार येतो. एकीकडे शिक्षणामुळे त्याचे समाजातलं स्थान मोठं होतं तर दुसरीकडे त्याच्या उदरनिर्वाहाचा रस्ता तयार होतो. शिक्षण मग ते कोणतेही असो ज्यात जो पारंगत असतो तो तसा पुढे विकसित होत जातो; पण अनादी अनंत काळापासून समाजव्यवस्थेची अशी मानसिकता झाली आहे की, सर्वसामान्य माणूस पुढे जाता कामा नये. त्यातूनच व्यक्तीचे बोन्साय करण्याची संकल्पना एका विशिष्ट गटाने अवलंबली आहे. माणसाच्या चांगल्या आचारविचारांना काटछाट करून विशिष्ट मर्यादितच त्यांनी जगावं, अशी योजना करून ठेवलेली आहे. अर्थात, ही योजना छुप्या स्वरूपाची असल्याने आपल्याला दृश्य स्वरूपात ती कधीच दिसत नाही. म्हणून आज समाजामध्ये खूप शिकलेल्या लोकांनासुद्धा म्हणावं तेवढं उच्च स्थान प्राप्त होत नाही. हा छुपा बोन्साय करण्याचा मार्ग अनादी अनंत काळापासून आपल्या समाजव्यवस्थेमध्ये रूढ झाला आहे. आपल्याला तो उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. त्यासाठी असावो लागतो स्व दूरदृष्टीपणा.

- डॉ. गजानन पाटील
-------------

हा दूरदृष्टीपणा मुलांच्यात वेळीच आला तर त्यांच्या विद्वतेचे बोन्साय कोणी करू शकणार नाहीत. त्यासाठी यवतमाळ डाएटला काम करत असताना सराव पाठशाळेतील व डीएडच्या मुलांसाठी एक दूरदृष्टीचे रहस्य शिकवण्यासाठी एक उपक्रम आखला. त्याचे नाव बोन्साय प्रकल्प. यामध्ये बागेच्या एका बाजूला मोठ्या आकाराच्या सिमेंटच्या कुंड्या घेऊन त्यामध्ये मुलांच्या मदतीने वड, पिंपळ, आंबा यासारखी मोठी होणारी झाडं लावली. मुलांना झाडांची देखभाल करण्यास झाडं वाटून दिली. मुलांना वाटलं ही झाडं इतर झाडांसारखीच जगवायचीत; पण तसं नव्हतं. मुलांची स्व दूरदृष्टी विकसित करण्यासाठी हा प्रयोग होता. दोन महिन्यात रोपांना पालवी चांगली फुटली. त्या पालवीच्या पुढे चार-पाच महिन्यांनी छान फांद्या तयार झाल्या. मुलांना मोठी झालेली रोपं पाहून खुप आनंद झाला; पण एके दिवशी सर्व मुलांना एकत्रित करून आज आपण या रोपांच्या फांद्या कट करून या रोपांचे बोन्साय कसे करायचे हे प्रात्यक्षिक दाखवतो, असे म्हणून कात्रीने रोपांच्या कोवळ्या फांद्या कट केल्या. रोपं ओकीबोकी झाली. मुलांना सांगितलं, आता पहिल्यापेक्षा रोपांकडे जादा लक्ष द्या. पुढे पुन्हा तीन-चार महिन्यांनी रोपे पुन्हा पालवींनी बहरली तेव्हा पुन्हा त्यांची पालवी कट केली. असं करत दीड वर्षात रोपं मोठ्या झाडासारखी दिसू लागली; पण ती बोन्साय केल्याने खुजी झाली. मग एक दिवस सर्व मुलांना हॉलमध्ये बसवून त्या झाडांचं बोन्साय कसं केले. आपण वेळोवेळी त्याला आलेली हिरवीगार पालवी कट करत गेलो. त्याला खुजं केलं. अगदी तसंच प्रत्येक माणसाचं बोन्साय करण्याची या व्यवस्थेमध्ये एक छुपी यंत्रणा आहे. ही यंत्रणा आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपलं बोन्साय होऊ नये म्हणून आपली स्वदूरदृष्टी विकसित केली पाहिजे. मग त्यांना छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाविषयीचा प्रयत्न सांगितला. त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावं, शिक्षणातून पिढी घडावी यासाठी जो प्रयत्न केला ते सांगून वाईट संगतीने आपले बोन्साय होता कामा नये त्यासाठी जसं झाडाला परिपूर्ण त्याच्या पद्धतीने वाढवून देण्याचा दूरदृष्टीपणा असतो तसाच स्वतःविषयी असावा. मुलं चकित झाली. गेली दीड वर्ष सर आपल्याला हे मूल्य बिंबवण्यासाठी हा प्रयोग करत होते याचं मुलांना खूप आश्चर्य वाटलं. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, आपल्या समान व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस शिकून मोठा होत निघाला की, त्याला वाईट संगतीत ओढून बोन्साय केले जाते. हे होऊ नये म्हणून शिक्षणाच्या मदतीने समाजव्यवस्थेने जर काही प्रयत्न केले तर कदाचित २०४० मध्ये तयार होणारी नवी पिढी ही देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारी असेल.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com