सुदृढ माता, बालक स्पर्धेला वेंगुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुदृढ माता, बालक स्पर्धेला
वेंगुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
सुदृढ माता, बालक स्पर्धेला वेंगुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

सुदृढ माता, बालक स्पर्धेला वेंगुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

88546
वेंगुर्ले ः सुदृढ माता व बालक स्पर्धेदरम्यान अॅड. सुषमा खानोलकर यांनी मार्गदर्शन केले.


सुदृढ माता, बालक स्पर्धेला
वेंगुर्ले येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः जागतिक महिला दिनानिमित्त लिनेस क्लब वेंगुर्ले व टांककर शेटये ट्रस्ट यांच्यातर्फे येथील ग्रामीण रुग्णालयात सुदृढ माता व बालक स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्या ६० मुले व ५८ महिलांची शारीरिक तपासणी व बौद्धिक चाचणी घेण्यात आली.
स्पर्धेमध्ये १ ते ३ वयोगटात सारक्षा तांडेल, राघव पोवार, आराध्य केरकर, विशाल राणे व सय्यानसाठी, ४ ते ६ वयोगटात तेजस्वी तुळसकर, आत्रेया आचार्य, शुभ्रा भगत तर सुदृढ मातांमध्ये अश्विनी राणे, निशा केरकर, गौरी रगजी, मानसी भगत व मधुरा कदम या विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक बक्षिसे देण्यात आली. उपस्थित सर्व महिला व बालकांना खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या. डॉ. स्वप्नाली माने-पवार व लिनेस अध्यक्ष अॅड. सुषमा प्रभू खानोलकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी डॉ. सुप्रिया रावळ, लिनेस ट्रेझरर कविता भाटिया, लिनेस मंदाकिनी सामंत, अंजली धुरी, बिना भाटीया, स्मिता कोयंडे, नर्स तांडेल, टेक्निशियन साळगांवकर, अंगणवाडी सेविका साधना कोणेकर, बागवे, अल्फिना बादेर, आरेकर, उज्वला पालव, चव्हाण, कांबळे, फाटक उपस्थित होत्या.