मालवणातील रस्त्यांसाठी ५ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील रस्त्यांसाठी ५ कोटी
मालवणातील रस्त्यांसाठी ५ कोटी

मालवणातील रस्त्यांसाठी ५ कोटी

sakal_logo
By

88541
वैभव नाईक

मालवणातील रस्त्यांसाठी ५ कोटी

आमदार वैभव नाईक; सततच्या पाठपुराव्याला यश

मालवण, ता. १२ : मतदारसंघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून ५० ग्रामीण मार्गांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. आपण पाठपुरावा करून हा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. त्यामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
ग्रामीण मार्ग दुरुस्तीची मंजूर करण्यात आलेली कामे अशी - कोळंब सर्जेकोट मार्ग संरक्षण भिंत रस्ता १० लाख, बिळवस सातेरी मंदिर मार्ग १० लाख, किर्लोस धनगरवाडी भरडवाडी मार्ग १० लाख, राठीवडे हरीजनवाडी व पुजारेवाडी मार्ग १० लाख, ओझर रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब मार्ग १० लाख, ओझर खैदा साळकुंभा कुर्ले भाटले नांदरुख मार्ग १० लाख, कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाड रस्ता १० लाख, पेंडूर खरारे रायवाडी मुगचीवाडी वेताळमंदिर मार्ग १० लाख, बांदिवडे कोइल मार्ग १० लाख, आंबडोस पावनवाडी मार्ग १० लाख, असगणी पन्हाळवाडी ते कृषि विज्ञान केंद्र मार्ग १० लाख, रामगड सांडवे ते रामगड जांभळखडी मार्ग १० लाख, देऊळवाडी भरतेश्वर मंदिर ते मठ मार्ग १० लाख, आडवली मालडी मार्ग १० लाख, देवली चिंचेचा व्हाळ बंडावाडा ते बावखोल रस्ता १० लाख, चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग १० लाख, चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग १० लाख, रामगड देऊळवाडी रस्ता १० लाख, श्रावण गवळीवाडी मार्ग १० लाख, वर्दे नागझरवणे मार्ग १० लाख, बुधवळे मळेशेतवाडी मार्ग १० लाख, आचरा हिर्ले मुणगेकर घाटी ते तुरुपवाडी रस्ता १० लाख, वायंगणी घाडीवाडी स्मशानभूमी ते नंददीप मार्ग १० लाख, चिंदर सडेवाडी मार्ग १० लाख, त्रिंबक पलीकडची वाडी मार्ग १० लाख, बुधवळे पेठवाडी मार्ग ९ लाख, डिगस किणकोस मार्ग ९ लाख, ओसरगाव मळीसडा असरोंडी मार्ग ९ लाख, कुंदे हरिजन भटवाडी मार्ग ९ लाख, कुपवडे गवळवाडी तोरबवाडी मार्ग ९ लाख, पडवे चिरेखान मार्ग ९ लाख, गावराई तेलीवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी मार्ग १० लाख, भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी मार्ग ९ लाख, पांग्रड काजीमाचे टेंब मार्ग ९ लाख, कडावल तावडेवाडी मार्ग १० लाख, आवळेगाव रस्त्यावरील टेंबवाडी दाबटेवाडी मार्ग ९ लाख, घोटगे सोनवडे कळसुली लाडवाडी दुर्गनगर मार्ग १० लाख, भडगाव बु रामा १७९ डिगळवाडी मार्ग १० लाख, वालावल हुमरमळा, बिजोळेवाडी मार्ग १० लाख, कवठी देऊळवाडी अशांतवाडी मार्ग १० लाख, कुडाळ आकेरी गावडेवाडी मार्ग १० लाख, पावशी मिटक्याची वाडी माश्याची वाडी मार्ग १० लाख, बाव मुख्य रस्ता ते वेताळ पाणदर गोळवणवाडी मार्ग १० लाख, आकेरी हुमरस साळगाव मार्ग १० लाख, नेरूर चौपाटी ते कांडरी वाडी वालावल मुडतुल कोठारेवाडी मार्ग १० लाख, आंबडपाल भद्रकाली देवालय मार्ग १० लाख, झाराप गोडेवाडी १० लाख, मुळदे खुटवळवाडी बामणादेवी निवजे कॅम्प रस्ता १० लाख, तुळसुली केरवडे माणगाव मार्ग १० लाख, कालेली हरिजनवाडी मार्ग १० लाख, मोरे बांदेकरवाडी मार्ग ९ लाख हि कामे मंजूर आहेत.