कायदेविषयक शिबिराला
वेंगुर्लेत महिलांचा प्रतिसाद

कायदेविषयक शिबिराला वेंगुर्लेत महिलांचा प्रतिसाद

88545
वेंगुर्ले ः परबवाडा येथील कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमावेळी दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कायदेविषयक शिबिराला
वेंगुर्लेत महिलांचा प्रतिसाद
वेंगुर्ले, ता. १२ ः येथील विधी सेवा समिती व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा ग्रामपंचायत येथे कायदेविषयक शिबिर झाले. दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील ११० महिला उपस्थित होत्या.
सहन्यायाधीश डी. वाय. रायरीकर व गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी महिलांच्या सुरक्षाविषयक माहिती दिली. अॅड. वेदिका राऊळ यांनी महिलांविषयी राज्य घटनेतील तरतूदींबाबत मार्गदर्शन केले. वकिल संघटनेच्या अध्यक्ष अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी महिलांवर आलेल्या संकटांवर कशी मात करावी व त्यासाठी कोणकोणते कायदे आहेत, याबाबत माहिती दिली. सरपंच शमिका बांदेकर यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आपल्या दैनंदिन जीवनात वेळप्रसंगी उपयोग करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी एस. टी. सामंत, उपसरपंच पपू परब, पोलिस हेडकॉन्स्टेबल रंजिता चौहान, रुपाली पाटील, ग्रामसेवक प्रविण नेमण, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुण गवंडे, सुहिता हळदणकर, हेमंत गावडे, माजी सभापती सारिका काळसेकर, माजी सरपंच इनासिन फर्नांडीस, अॅना डिसोजा, गौरी सावंत, मुख्याध्यापिका रॉड्रीक्स, मनवेल फर्नांडीस, संजय मळगांवकर, पत्रकार के. जी. गावडे व प्रथमेश गुरव उपस्थित होते. यावेळी परबवाडा गावातील सविता परब, स्वाती पवार, शालिनी पारकर, रत्नप्रभा साळगांवकर, नयना मोर्ये, प्रतीक्षा भोवर, संयोगिता सातोस्कर, सुवर्णा सावंत, रोजालिन फर्नांडीस या कर्तबगार महिलांचा न्यायाधीश पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. अॅड.श्वेता चमणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com