रेल्वे स्थानकांकडे जाणार्‍या रस्त्यांसाठी 66 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्थानकांकडे जाणार्‍या रस्त्यांसाठी 66 कोटी
रेल्वे स्थानकांकडे जाणार्‍या रस्त्यांसाठी 66 कोटी

रेल्वे स्थानकांकडे जाणार्‍या रस्त्यांसाठी 66 कोटी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p२.JPG- KOP२३L८८५३२ कोकण रेल्वेचे रत्नागिरी स्थानक
---------------
रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ६६ कोटी

काँक्रिटीकरणासाठी तरतूद ; प्रवाशांना मिळणार दिलासा
रत्नागिरी, ता.१२ : कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात सरकारने केली आहे. त्यामुळे हे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे स्थानकांकडे जाणार्‍या रस्त्यांवरुन प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनोमुळे कोकण रेल्वे तोट्यात चालत होती. त्यामुळे कोकण रेल्वेला रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी नसल्याने प्रवाशांच्या रोषाला बळी पडावे लागत होते. परंतु अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. ही तरतूद झाल्याने कोकण रेल्वेवरील मोठा अर्थभार कमी झाला असून प्रवाशांसाठी आता इतर मुलभूत सुविधांवर कोकण रेल्वे प्रशासनाला भर देता येईल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन वहाळकर यांनी व्यक्त केला. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, राजापूरसहीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या रेल्वे हद्दीतील रस्त्यांची काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अर्थसंकल्पात रस्ते काँक्रिटीकरणासाठी ६६ कोटींची तरतूद केली आहे. बांधकाम मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला होता.
------------
चौकट
रत्नागिरीतील तो मार्गही होईल दुरुस्त
रत्नागिरीत मुख्य रस्त्यावरुन रेल्वे स्थानकाकडे जाणारा एक दिशा मार्ग डांबरीकरण झाला आहे; मात्र रेल्वेस्थानकावरुन येणार्‍या बाजूचा मार्ग दुरुस्ती करण्यात आलेली नाही. राज्य शासनाकडून तरतूद झाल्यामुळे दुसर्‍या बाजूचा हा मार्गही व्यवस्थित होईल अशी आशा निर्माण झाली आहे.