छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 10 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 10 कोटी
छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 10 कोटी

छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 10 कोटी

sakal_logo
By

KOP२२L६८४१५

छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी १० कोटी
आमदार प्रसाद लाड ः २५ मार्च पर्यंत प्रस्ताव पाठवणार
संगमेश्वर, ता. १२ : छत्रपती संभाजी महाराज यांना ज्याठिकाणी औरंगजेबाने कैद केले, त्या संगमेश्वर परिसरात महाराजांचा भव्य पुतळा आणि वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी राज्य सरकारने १० कोटींचा निधी मंजूर केला. कसबा येथे शनिवारी (ता. ११) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने झालेल्या धर्मरक्षण दिनाच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली.
आमदार लाड म्हणाले, ‘कसबा येथील कार्यक्रमाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून माहिती दिली होती. या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, अशी येथील लोकांची मागणी आहे. तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तत्काळ बोलून यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. तशी घोषणा या कार्यक्रमात करण्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याप्रमाणे इथल्या स्मारक आणि वस्तुसंग्रहालयासाठी राज्य शासन सकारात्मक असून २५ मार्चपर्यंत इथल्या जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागा निश्चित करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे लाड यांनी सांगितले. महाराजांचे स्मारक उभे करणारच आहोत, पण ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल-हाल करून त्यांना मारले त्या औरंगजेबाचं थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाहीत, तोपर्यंत महाराजांच्या बलिदान सार्थकी लागणार नाही. त्यासाठी तुम्हा सगळ्याची साथ आणि सहभाग हवा आहे, असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले.

या वेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार शेखर निकम, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार सदानंद चव्हाण, आयोजक प्रमोद जठार, राजेंद्र महाडिक, सुजित महाडिक, समितीचे प्रमोद अधटराव आदी उपस्थित होते.