रत्नागिरी-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सदर
रत्नागिरी-सदर

रत्नागिरी-सदर

sakal_logo
By

२८ फेब्रुवारी टुडे पान २ वरून लोगो घेणे....

निरोगी राहण्याचा मंत्र ः आयुर्वेद ................लोगो

फोटो ओळी
-rat१२p१५.jpg -निरंजन गोखले--KOP२३L८८५३०
------
इंट्रो
"स्नेहमय: पुरुष:" म्हणजेच आपलं शरीर हे स्नेहमय, स्नेहयुक्त आहे आणि ते स्नेहयुक्त ठेवणं आवश्यक आहे. आपलं शरीर हे एक प्रकारचं यंत्र आहे. एक सजीव यंत्र, स्वयंचलित यंत्र.जसं एखाद्या यंत्राला आपल्याला नेहमी वेल लुब्रिकेटेड ठेवावं लागतं, आपल्या गाडीचं इंजिन ऑइल वेळेवर बदलावं लागतं, साधं शटरला सुद्धा वारंवार ग्रीसिंग करावं लागतं, गाडीच्या चेन, ब्रेक्स इत्यादी ठिकाणी ऑइल सोडावं लागतं, जेणेकरून ही सगळी यंत्र बिनदिक्कतपणे चालायला हवी. कोणताही अडथळा न येता. मग आपलं हे शरीर नावाचं यंत्र जर बिनदिक्कत चालायला हवं असेल तर त्याचं ऑइलिंग नियमितपणे करायलाच हवे. त्यासाठी अभ्यंग गरजेचे आहे.
.............

डॉ. निरंजन गोखले, चिपळूण

शरीराला रोज व्यवस्थित तेल लावणे आवश्यक

शास्त्रकारांनी अभ्यंगम् आचरेत नित्यम् असा शब्द वापरला आहे."नित्य"म्हणजेच नेहमी,सदैव, रोज. अभंगासाठी आपण दहा ते पंधरा मिनिटे वेळ काढणं हे जीवनावश्यक आहे. अन्यथा आपल्या शरीराची नित्य होणारी झीज, मणक्यांची झीज, सांध्यांची झीज, केसांचे गळणे, अकाली वार्धक्य, वळ्या पडणं, त्वचा निस्तेज होणं, हे सगळं आपण अनुभवतो आहोतच. नसाल अनुभवत तर लवकरच अनुभवणार आहात आणि हा शरीराचा, आरोग्याचा डाऊनफॉल अनुभवायचा नसेल तर रोज अभ्यंग करणे आवश्यक आहे. अभ्यंग म्हणजे नक्की काय? तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराला व्यवस्थित तेल लावणे. (दुसरा लावणार असेल तर अतिशय उत्तमच. एकमेकांच्या लावायला काहीच हरकत नाही.) दिवाळीला अभ्यंग स्नान एवढ्या पुरतच ते आपल्याकडे मर्यादित राहिलं आहे. पण ते तसं राहता कामा नये. हे का करायचं? कारण नित्य शरीरात वाढणारा वात आणि शरीराची नित्य होणारी झीज. हे आटोक्यात आणायचं असेल तर वाताला ज्याने जिंकता येतं किंवा वाताच जे परम औषध आहे असं तिळाचं तेल लावलं गेलं पाहिजे कारण वात हा सतत वाढतोच आहे. रोज त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. या ना त्या कारणाने तो वाढतच आहे. कधी कधी आपल्या विशेष प्रयत्नाने वाढत असतो तो भाग वेगळा. म्हणजे बघा हा..."पंखा"..याशिवाय आपण जगू शकतो का? फुल स्पीडने डोक्यावर फिरणारा पंखा नियमितपणे आपल्या शरीरातला स्नेह, स्निग्धता शोषून घेतो, शरीराला कोरडं करतो. "एसी" ..एसीने गारवा वाढून शरीराला कोरडेपणा येतो आपली बारीक बारीक स्रोतसं, नाक, त्वचेची रंध्र, कोरडी होतात. रोजचा गाडीवरून, बाईक वरून प्रवास ..याने तर थेट अंगावर प्रचंड वेगात वारा लागतो. खड्ड्यांच तर विचारूच नका. त्यांनी मान, पाठ, कंबर सगळ्याचीच वाट लागते. बाईकला असणाऱ्या व्हायब्रेशनमुळे हात, खांदे ते मानेपर्यंत हात थरथरत राहतात आणि नकळतपणे झीज होत राहते. जरी गाडीने, बसने, लोकल ट्रेनने विमानाने, कशानेही प्रवास केला तरी शरीराची गती वाढल्यामुळे वाढणारा वात हा आपलं नुकसानच करत असतो. हे सगळं कमी की काय म्हणून आपण मुद्दाम सकाळी चालायला जाणार, जिममध्ये जाऊन उरफुटेस्तोवर व्यायाम करणार, रात्रीच चालणार, ट्रेडमिलवर धावणार, इत्यादी गोष्टी करून वात वाढवतच असतो. जास्त वेळ उपाशी राहिलं तरी वात वाढतो, जागरण केली तरी वात वाढतो. वात वाढतो म्हणजेच काय होतं? तर शरीराची झीज होते. त्याने पोकळी तयार होते. तिथे वायू येऊन ती जागा व्यापतो. वाताचे जे गुण आहेत- कोरडेपणा, हलकेपणा, गारवा, खरखरीतपणा, गती, हे गुण फाजील प्रमाणात वाढतात आणि विविध आजार चालू होतात. मग एवढा जर वात वाढणार असेल तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे काढून आपण स्वतःच्या शरीराला तेल लावणार नसू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. त्यातही शास्त्रकारांनी त्यातल्या त्यात किमान एवढं तरी करा म्हणून डोकं, कान, पाय या तीन ठिकाणी तरी तेल लावा असं सांगून ठेवल आहे. किमान पादाभ्यंग, कानात तेल घालणे किंवा कानाला तेल लावणे, डोक्यावर तेल घालणे एवढं तरी करायलाच हवं. नाहीतर सांधेदुखी मणक्याची झीज, अकाली वार्धक्य, गृध्रसि (sciatica), अवाबहुक (frozen shoulder), टक्कल पडणे, त्वचा कोरडी पडणे, पचनाचे विविध त्रास, अगदी तरुण वयात येणारे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, अर्धांग, या सारखे अनेक छोटे ते मोठे भयंकर आजार याला आपण बळी पडू शकतो. पुढच्या लेखामध्ये अभ्यंग रोज केल्याने अजून कोणते फायदे होतात तेही पाहूया..

(लेखक वाग्भट चिकित्सालय, रत्नागिरी आयुर्वेद चिकित्सालय, आडिवरे येथे कार्यरत आहेत.)