रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

कास्ट्राईब शिक्षक संघटनाही संपात सहभागी
पावस : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) पुकारलेल्या बेमुदत संपात कास्ट्राईब शिक्षक संघटना पूर्ण शक्तीसह उतरणार असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी दिली. राज्यातील २००५ नंतर नियुक्त कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व संघटना १४ मार्चपासून
बेमुदत संपात सहभागी होत आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना सहभागी होणार आहे. संप यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि राज्य पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संपामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. वाघोदे, जिल्हा सचिव विनोद सांगावकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

उत्कर्ष बाल विद्यामंदिरचा
वर्धापनदिन उत्साहात
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली येथील उत्कर्ष बाल विद्यामंदिराचा २५ वा वर्धापनदिन समारंभ उत्साहात झाला. मराठा मंदिर शिक्षण संस्थेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी रावराणे यांच्याहस्ते समारंभाचे उदघाटन झाले. यावेळी त्यांनी सरस्वती पूजन व संस्थापक (कै.) अण्णा पालकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केला. या वेळी माजी सरपंच मंगेश झरेकर, सहसंस्थापक अरविंद पालकर, व्यवस्थापक मो. पा. गोठिवरेकर, अनंत उर्फ भाऊ वेल्हाळ, मुख्यशिक्षिका सौ. जयश्री म्हेतर, सहशिक्षिका सौ. माधवी सुर्वे, पाली दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे मोहन कांबळे, पेन्टर चंदू कांबळे, नृत्यदिग्दर्शक सौ. स्वाती कांबळे, श्रुती सावंत, सुधीर सावंत आदी उपस्थित होते. वर्धापन दिनात आजी-माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. पालक वर्गाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. श्री व सौ गोठिवरेकर, भाऊ वेल्हाळ, चंदू कांबळे आदी उभयतांचा सत्कार करण्यात आला. ही बालवाडी कोणत्याही शासकीय अनुदान अर्थ सहाय्याने चालत नाही ती २५ वर्षे स्वतःच्याच आर्थिक बळावर सुरू असल्याचे प्रस्तावनत सांगण्यात आले.


स्वयंभू महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी पालखी दर्शन
रत्नागिरी ः पारंपरिक शिमगोत्सवाचा भाग म्हणून आकाशवाणी केंद्रासमोरील महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवता महाकाली-महालक्ष्मीची पालखी मंगळवारी (ता. १४) येणार आहे. मंगळवारी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रांगणात ओट्या भरता येतील. पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासाचे उपमुख्य विश्वस्त शशिकांत बारगोडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com