चिपळूण - चिपळूणची सिग्नल यंत्रणा 23 वर्ष बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूणची सिग्नल यंत्रणा 23 वर्ष बंद
चिपळूण - चिपळूणची सिग्नल यंत्रणा 23 वर्ष बंद

चिपळूण - चिपळूणची सिग्नल यंत्रणा 23 वर्ष बंद

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१२P४.JPG- KOP२३L८८५३४
चिपळूण ः बंद अवस्थेत असलेली शहराची सिग्नल यंत्रणा.
- rat१२P५.jpg- KOP२३L८८५३५
शहरात गटारांवर उभे केलेल्या दुचाकी.
- rat१२P६.JPGः KOP२३L८८५३६
सिग्नलअभावी शहरातील वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही.
- rat१२P७.JPG ः KOP२३L८८५३७
बहादूरशेख नाका येथे नेहमी वाहनांची वर्दळ असते.
- rat१२P८.jpg ःKOP२३L८८५३८
चिपळूण शहरातील वाढत्या वर्दळीमुळे सिग्नल यंत्रणा अपरिहार्य बनली आहे.
- rat१२p९.jpg- KOP२३L८८५३९
चिपळूण शहरात पार्किंगच्या जागेत अशा प्रकारे दुकाने थाटलेली आहेत
--------------

चिपळुणात २३ वर्षे
सिग्नल यंत्रणा गायब
-
नागरिक वाहतूक कोंडीने बेजार ; वाहतूक पोलिस दंड करण्यात मग्न

इंट्रो
चिपळूण शहराचा विस्तार वाढत नाही; मात्र शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे; मात्र वाहूतक पोलिस विविध चौकांत आणि मुख्य रस्त्यावर थांबून केवळ दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त आहेत. उन्हाळा असो किंवा पावसाळा पोलिस रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसून येतात. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाही. १९९६ मध्ये सुरू झालेली सिग्नल यंत्रणा १९९९ मध्ये बंद पडली ती २३ वर्षात पुन्हा सुरू झाली नाही. चिपळूण शहरात उपजीविकेसाठी येणाऱ्या तरूणांना घरी पोहोचण्यापूर्वी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हे तरुण घरी पोहोचेपर्यंत कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागतो. या स्थितीचे अवलोकन राज्यकर्ते केव्हा करणार, असा प्रश्न आहे. शहरातील वाहतूक अव्यवस्थेचा घेतलेला हा आढावा......

- मुझफ्फर खान, चिपळूण


मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका चिपळूण शहराचे प्रवेशद्वार आहे. तेथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करतानाच नागरिकांचे वाहतूक कोंडीने स्वागत होते. एक किमीच्या प्रवासासाठी काही रस्त्यावर अर्धा तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. बहादूरशेखनाका येथे सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. येथे खेडकडे जाणारा आणि सावर्डेच्या दिशेने जाणारा एक मार्ग बंद आहे. एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असल्यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे जुनी पोलिसचौकी तोडण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिसांना थांबण्यासाठी कंटेनरची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. हे कंटेनर असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. कारण, या कंटेनरमध्ये प्रचंड गरम होते. गरम होत असल्यामुळे सकाळी दहानंतर त्यात थांबता येत नाही.


चिंचनाक्यात सकाळपासून कोंडी
शहरातील चिंचनाका हा मुख्य रहदारीचा मार्ग आहे. हा शहरातील मुख्य सर्कल असल्यामुळे येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. दिवस उजाडल्यानंतर येथील वाहतूककोंडीला सुरवात होते. पूर्वी येथे सकाळी आणि सायंकाळी पोलिस असायचे. आता होळीच्या निमित्ताने पोलिसाचे दर्शन होत आहे. अनेक वाहनचालक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करून खरेदीला जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. येथे सिग्नल यंत्रणा उभारली किंवा वाहतूक पोलिस उभे केले तर वाहतुकीला शिस्त लागेल.


पॉवरहाऊस नाका
मुंबई-गोवा महामार्गावर पॉवरहाऊस नाका आहे. त्याला पागनाका असेही म्हणतात. येथे शहरात प्रवेश करण्यासाठी एक मार्ग आहे. दुसरा मार्ग पाग भागाकडे जातो. येथे एसटीसह खासगी वाहने वळतात तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. महावितरणचे कार्यालयसुद्धा येथेच आहे. एखादे वाहन शहरात किंवा पाग भागाकडे प्रवेश करत असेल आणि त्याचवेळी भरधाव वेगाने महामार्गावरून वाहन आले तर दोन्ही वाहनचालकांचा अंदाज चुकला तर येथे अपघात होतात. येथे दुचाकीस्वारांचा अनेकवेळा अपघात झाला आहे. पॉवरहाऊसपासून हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे आहे. येथील अपघात कमी करणे आणि भरधाव वेगाने येणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणेची गरज आहे.


सिग्नल यंत्रणा २३ वर्षे बंद
चिपळूण शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी १९९६ मध्ये चिपळूण पालिकेने सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली. तेव्हा शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची फारशी वर्दळ नव्हती. तरीही १९९९ पर्यंत ही यंत्रणा चालली. नंतर मात्र ती बंद पडली ती पुन्हा सुरू झाली नाही. पालिकेकडूनही सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस विभागाने शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तेवढा पाठपुरावा झाला नाही. शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणेचे लोखंडी खांब गंजलेल्या अवस्थेत उभे आहेत.

चार पोलिसांवर शहराच्या वाहतूकीची जबाबदारी
शहरातील मुख्य बाजारपेठेत पद्माचित्र मंदिरच्या परिसरात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. शहराची वाहतूक यंत्रणा संभाळण्यासाठी तेथे केवळ चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यात एक पुरुष आणि तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गांधीचौक, बहादूरशेख नाका चिंचनाक्यात पोलिस ठाण्यातील एक बहादूरशेख नाका येथे महामार्ग विभागाचे दोन पोलिस कर्मचारी, असे तीन कर्मचारी असतात.


रिंगरोडचा विषय बारगळला
शहरात काही वर्षापूर्वी रिंगरोडचा प्रयोग झाला होता. सकाळी ११ ते ४ या दरम्यान मालवाहतूकीच्या गाड्यांना प्रवेश देणे आणि शहरातून जाणाऱ्या एसटी गुहागर बायपास मार्गे वळवण्यात आल्या होत्या. त्याला व्यापाऱ्यांसह काही राजकीय लोकांनी प्रसिद्धीपोटी विरोध केला. त्यामुळे रिंगरोडचा विषय बारगळला. चिपळूण नगर पालिका, वाहतूक पोलिसांची शाखा, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण शहराची ही मुख्य समस्या बनली आहे. मार्कंडीतून चिंचनाकामार्गे पालिकेकडे जाणारा मार्ग एकेरी केला पाहिजे. चिंचनाक्यात येणारी वाहने खेडेकर क्रीडासंकूल येथून देसाई मोहल्ला, वडनाकामार्गे वळवली पाहिजे, तसे झाल्यास मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करता येणे शक्य आहे.

वाहतुक कोंडीची कारणे
-अरुंद रस्ते
-रस्त्यावरील फेरीवाले, किरकोळ व्यवसायिक
-विविध ठिकाणी सुरू असलेली विकास कामे
-रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारे वाहनांचे पार्किंग
-शहरात वेगमर्यादा, नो पार्किंग स्पॉटचे फलक नाहीत
-एकेरी रस्त्याच्या सुरवातीला पोलिस थांबत नाहीत
-शहरात अवजड वाहनांना सहज प्रवेश मिळतो त्यामुळे वाहतूक कोंडी होते
-सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकाच मार्गाचा वापर होतो
-दंड वसुली हे वाहतूक पोलिसांचे मुख्य उद्देश


इथे थांबतात पोलिस

-पालिका परिसर,
-पद्माचित्र मंदिर परिसर
-नाथ पै चौक
-भेंडीनाका


इथे हवेत वाहतूक पोलिस
-गुहागरनाका
-जुने बसस्थानक
-फरशीतिठा
-जिप्सी कॉर्नर परिसर
-नाईक कंपनी पूल
-डीबीजे महाविद्यालय परिसर
-गुहागर बायपास रोड
-उक्ताड सर्कल.


फोटो ओळी
- rat१२p१०.jpg- अजित चव्हा-KOP23L88525
---
कोट
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पूर्वी कंट्रोल केबिनच्या बाजूला पोलिसांची चौकी होती. बसस्थानकाचे काम सुरू केल्यापासून येथील चौकी तोडण्यात आली. त्यानंतर येथे पोलिसांचे थांबणे बंद झाले आहे. पोलिस नसल्याचा आणि गर्दीचा गैरफायदा घेत बसस्थानकावर चोरीच्या अनेक घटना घडतात; मात्र त्या उघड होत नसल्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे जाणेच बंद केले आहे.
---अजित चव्हाण, खेर्डी


फोटो ओळी
-rat१२p१७.jpg- दत्ता शेळकेKOP23L88573
कोट

चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तसेच चिपळूण पोलिस ठाण्याचे कर्मचारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. होमगार्ड आणि महामार्ग विभाग पोलिसांचीही मदत घेतली जाते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बहादूरशेख नाक्यावर प्रचंड कोंडी होते. रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली तर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीचीही मदत घेतली जाते. नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यातून मार्ग निघेल. शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त झाली आहेत. पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी चालक, बस, रिक्षा चालकांनी नियम पाळत वाहने चालवली तर काही प्रमाणात या समस्येतून मार्ग काढता येईल.
- दत्ता शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, रत्नागिरी
------------

फोटो ओळी
- rat१२p१२.jpg- निहार कोवळेKOP23L88527
----
कोट
वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, नो एंट्री मधून जाणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवण्याचा बेशिस्त प्रकार वाहन चालकांकडून सुरू आहे. अशा बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस उतावीळ असल्याचे पहायला मिळतात. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना कोणत्याही प्रकारची सूचना केली जात नाही. थेट चलन फाडून त्याला एक प्रकारची शिक्षाच दिली जात आहे. वाहतूक शाखेत महिला पोलिसांचा भरणा जास्त आहे. त्यामुळे पुरूषांना हुज्जत घालता येत नाही. वाहतुकीला शिस्त लावावी यासाठी दंड लावणे हा एकमेव पर्याय नाही. रस्त्यावर जास्त पोलीस असणे गरजेचे आहे. नियम तोडल्यास परवाना रद्द करावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवा, लहान मुलांना वाहतुकीबाबत प्रशिक्षण द्या असे उपाय करणे गरजेचे आहे.
--निहार कोवळे, चिपळूण

फोटो ओळी
- rat१२p११.jpg- माधव सोहनीKOP23L88526
कोट
शहरातील बाजारपेठ विशिष्ठ भागात वाढली आहे. त्याचा विस्तार झाला आणि त्या भागातील रस्ते तयार झाले तर मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करणे शक्य आहे. काही ठिकाणी पालिकेने वाहन तळ उभारले आहे पण ते बाजारपेठेपासून लांब आहेत. बाजारपेठेत खरेदी केल्यानंतर वाहन तळापर्यंत येण्यासाठी नागरिकांना परत रिक्षा करावी लागते. रिक्षाला मीटर नसतो. त्यामुळे रिक्षाचे भाडेही आता अव्वाच्या सव्वा झाले आहे. त्यामुळे वाहन तळांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
- माधव सोहनी, चिपळूण
-------------
फोटो ओळी
- rat१२p१३.jpg- अंजली कदमKOP23L88528
---
कोट
शहरात रिंगरोड नाही. त्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोलात वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या चौकात पोलिस अनुपस्थित असतात त्यामुळे अनेक चौक डेंजर झोनमध्ये आहेत. वाहतूक नियंत्रण विभागाने दंड वसुलीला प्राधान्य देण्याऐवजी वाहतुकीला शिस्त लावण्याचे धोरण राबवण्याची गरज आहे. शहरातील बहादूरशेख नाका, चिंचनाका, पालिका परिसरात फेरफटका मारल्यानंतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे. याची कल्पना येऊ शकते. महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम आणि अंतर्गत अरूंद रस्ते या गोष्टीला जबाबदार आहे तसे पार्किंगच्या नियोजनाचा भोंगळ कारभारही जबाबदार आहे. शिवाय मोठ्या इमारतीमधील पार्किंगच्या जागांचे रूपांतर दुकान गाळ्यांमध्ये होऊ लागल्याने वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. रस्त्यावर किरकोळ भाजी विक्री करून पोट भरणाऱ्यांकडे वाहतूक पोलिस दुलर्क्ष करतात इथपर्यंत ठिक आहे पण ज्यांनी पार्किंगमध्ये दुकाने थाटली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
- अंजली कदम, चिपळूण