
दाभोळ-महिला सबलीकरणाच्या जागृतीसाठी सायकल फेरी
फोटो ओळी
-rat१२p१८.jpg- OP२३L८८५७७
दापोली ः पोलिस ठाण्यातील कर्मचारी मंजुश्री पाडावे यांचा सन्मान करताना सायकल प्रेमी.
महिला सबलीकरणाच्या
जागृतीसाठी सायकल फेरी
दापोलीत उपक्रम ; फेरीदरम्यान महिलांचा सत्कार
दाभोळ, ता. १२ ः स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण जनजागृतीसाठी दापोलीकरांनी काढली सायकल फेरी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका आदीप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली. दापोलीच्या जडणघडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या अनेक आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली-उपजिल्हा रुग्णालय- एसटी आगार- पोलिस ठाणे- बाजारपेठ- पोस्ट ऑफिस- शिवाजीनगर- नवभारत छात्रालय- आझाद मैदान असा ६ किमीचा होता. या मार्गावरील काही महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, लाडू, कॅडबरी, पाणी, सरबत देऊन स्वागत केले गेले. विचारे प्रॉडक्ट महिला गृहोद्योग कारखान्याला भेट देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान मशिन्सबद्दल माहिती जाणून घेतली.
दापोली उपजिल्हा रुग्णालय येथील परिसेविका घाग, जाधव, डॉक्टर, कर्मचारी, पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, मंजुश्री पाडावे आणि महिला पोलिस, एसटी आगार व्यवस्थापक रेश्मा मधळे, व्यवसायिक उद्योजिका माधुरी विचारे, अर्पिता मालू, वैशाली मेहता, श्रद्धा गायकवाड, नेहा तोडणकर, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्मिता सुर्वे, रितू मेहता, संजीवनी कदम, सारिका तलाठी, वर्षा गोरीवले, डॉ मानसी फाटक, डॉ. शुभांगी फाटक, डॉ. आनंदी सावंत, जयश्री खानविलकर, सुजाता प्रधान, योगसाधक अक्षदा साळवी, स्नेहा भाटकर, भाजीविक्रेते, प्रगतशील शेतकरी, गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही महिलांचा गौरव करण्यात आला. अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेतला. सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, पराग केळसकर, अमोद बुटाला, संदीप भाटकर, सत्यवान दळवी, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.