सावंतवाडीत मिनी पोलिस चौकीसह पाणपोई उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत मिनी पोलिस 
चौकीसह पाणपोई उभारणार
सावंतवाडीत मिनी पोलिस चौकीसह पाणपोई उभारणार

सावंतवाडीत मिनी पोलिस चौकीसह पाणपोई उभारणार

sakal_logo
By

88580
रफिक शेख

सावंतवाडीत मिनी पोलिस
चौकीसह पाणपोई उभारणार

रफिक शेख; गैरसोय होत असल्याने पुढाकार

सावंतवाडी, ता. १२ ः भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी पालिका कार्यालयासमोर मिनी पोलिस चौकी उभारण्याबरोबर त्याठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी दिली. त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेले पोलिस उन्हातान्हात उभे राहत असतात. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते श्री. राणे यांच्या वाढदिवसा दिवशी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. शेख यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, सावंतवाडी मोती तलावाच्या समोर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एका संस्थेकडुन त्याठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती; परंतु, तो तंबू अज्ञाताकडुन काढून टाकण्यात आला. त्यामुळे तूर्तास पोलिसांना झाडाखाली किंवा उन्हातच उभे रहावे लागत आहे. त्यांचे हे हाल लक्षात घेता श्री. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याठिकाणी कायमस्वरुपी मिनी पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरुन त्याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या तसेच आठवडा बाजारात येणाऱ्या लोकांनाही त्यांचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.