
तारकर्ली मठात १६ ला कार्यक्रम
तारकर्ली मठात १६ ला कार्यक्रम
मालवण : तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १६ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ८ वाजता श्री मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता ह. भ. प. गोविंद आसोलकर बाव कुडाळ यांचे कीर्तन, रात्री १० वाजता दत्तमाऊली पारंपरीक दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ''अघोरी शंकर'' अर्थात ''सहस्त्र नागबळी'' सादर होणार आहे. तरी स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी मठाच्या वतीने संयोजक राजेंद्र तारी यांनी केले आहे.
--
महानमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा
कुडाळ ः मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायत येथे महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. यावेळी तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांचा निकाल असा-संगीत खुर्ची: प्रथम कविता शिंदे, द्वितीय-समिक्षा हळवे, तृतीय-प्रियांका गावडे, स्मरणशक्ती स्पर्धा : प्रथम ऋता चव्हाण, द्वितीय सुकन्या परब, तृतीय-शिल्पा सावंत मेणबत्ती पेटविणे स्पर्धा : प्रथम प्रतिज्ञा हळवे, द्वितीय - समिक्षा हळवे, तृतीय-सई शिंदे सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, ग्रामसेवक सांगर देसाई, स्वाती घाडी, श्रद्धा हळवे तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, ग्रामसेवक सागर देसाई यांनी आभार मानले.
--
कणकवलीतील कार्यकर्ते शिवसेनेत
कणकवली ः कणकवलीत आयोजित शिवसेना मेळाव्यात भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलिस सब-इन्स्पेक्टर यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, विधानसभा प्रमुख संदेश पटेल मार्गदर्शनाखाली व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देत, भगव्या फिती गळ्यात घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यामध्ये भिरवंडेमधील अनिल सावंत, सागर सावंत, देवेंद्र सावंत, प्रमोद सावंत आदींनी सेनेत प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा गायकवाड, उपजिल्हा प्रमुख महिंद्र सावंत, बबन साळगावकर, संदेश पटेल, शरद वायंगणकर, भूषण परूळेकर, श्री. तेली, सुनील हरमलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--
देवगडातील दात्याचे मुंबईत रक्तदान
सावंतवाडी ः सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या देवगड शाखेचे रक्तदाते सचिन आयरे यांनी मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमधील ’कॅन्सर’ पीडित रुग्णासाठी बहुमुल्य रक्तदान केले. मुंबई येथील काम आटोपून गावी मार्गावर परतण्याच्या असताना ’व्हॉट्सअॅप’ ग्रुपवर आलेल्या एका ’मॅसेज’वरून त्यांनी रक्तदानासारखे पवित्र कार्य केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.